मराठी सिनेसृष्टी मध्ये अनेक कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये ज्या अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जातं ती म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. इंडस्ट्री अगदोरच एक सोनाली कुलकर्णी असताना सुद्धा ती इंडस्ट्री मध्ये आली आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.(Sonalee Kulkarni Career Begining)
नृत्याला अभिनयाची जोड देत सोनाली कुलकर्णी घराघरात पोहचली.छोटा पडदा आणि मोठा पडदा दोन्हीवर तिच्या कामाची छाप तिने पाडली आहे. तिच्या नृत्याचा, सौंदर्याचा मोठा असा चाहता वर्ग पाहायला मिळतो.कलाकार आपल्याला पडद्यावर दिसतात. आणि प्रेक्षक म्हणून बघताना आपल्याला ते सगळं अगदी सहज सोपं दिसत.पण प्रत्येक कलाकाराची स्वतःची अशी एक गोष्ट असते, आणि त्यामध्ये बरीच देखील आव्हान देखील असतात.
पाहा काय आहे किस्सा?(Sonalee Kulkarni Career Begining)
आज सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीमध्ये नावाजलेल्या अभिनेत्रींनपैकी एक आहे.परंतु पडद्यामागची गोष्ट काहींकवेळेला खास असते.सोनालीचे आई-वडील दोघेही आर्मी मध्ये होते.सोनालीचे वडील अगदी शिस्तप्रिय होते. सोनालीला लहानपनापासूनच अभिनेत्री व्हायचे होते.पंरतु तिच्या वडिलांनी अगदी स्पष्टपणे तिला सांगितले होते की. शिक्षण पूर्ण करावं लागेल. म्हणून तिने तिच्या क्षेत्राला पूरक असं शिक्षण घ्यायचं ठरवलं.पत्रकारिते साठी ऍडमिशन घेण्यासाठी ती विद्यालयात गेली होती.

तो पर्यंत सोनालीला इतकंच माहित होत, की तिला अभिनेत्री व्हायचं आहे. पण तिने हे ठरवलंच नव्हतं की ती कोणत्या भाषेत काम करणार आहे.मराठी सिनेसृष्टीमध्ये काम करण्यापूर्वी सोनाली मराठी भाषेत बोलायचीच नाही.आणि तेव्हाच तिला तिच्या हा खेळ संचिताचा या पहिल्या मराठी मालिकेची ऑफर आली होती, त्यात सोनाली अभिनेता विक्रम गोखले यांची नातं दाखवली होती.
हे देखील वाचा : ‘बाबा कुठेही असूदेत पण घरी नसूदेत’-वर्षा यांचं स्वतःच्या वडिलांनबद्दल का होतं असं मत?
त्या भूमिकेसाठी कथक हा नृत्यप्रकार करू शकणाऱ्या अभिनेत्रीची गरज होती, सोनालीला तेव्हा फक्त इतकंच माहित होत की, डान्स येणं गरजेचं आहे, जेव्हा ती ऑडिशनला गेली तेव्हा तिला कळालं, ही मराठी मालिका आहे,आणि तिने दिग्दर्शकांना सांगितलं की, मला अगदी तोडकं मोडकं मराठी येत.तेव्हा दिग्दर्शकांनी तिच्यावर विश्वास दाखवला. आणि तिने ही मालिका केली.आणि त्या नंतर मराठी सिनेसृष्टीला एक हरहुन्नरी अभिनेत्री मिळाली.(Sonalee Kulkarni Career Begining)
