नाना पाटेकर हे एक वादळपणाने आहेत हे कुणाला वेगळं सांगायची नाही. बरं असं असलं तरी या वादळी व्यक्तिमत्वामागे, या कठोर, उग्र, उद्धट भासणाऱ्या मुखवट्यामागे एक सहृदयी माणूस दडलेला आहे हे विसरून चालायचं नाही. कलाविश्वात अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वतःची जागा स्वतः निर्माण केली.(Nana Patekar Incident)
याशिवाय नाना पाटेकर हे सामाजिक बांधिलकी करणारे, मानवी हक्क जपणारे आणि न बोलता समाजकार्यात रस असणारे एक व्यक्तिमत्व आहेत. मराठी चित्रपटांसोबत नानांनी बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. बॉलिवूडमध्ये डंका वाजवाऱ्या नानांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात ही नाटकांपासून केली होती.
एक काळ असा होता जेव्हा नाना पाटेकर यांना नाटकांमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली होती. त्यांच पुरुष हे नाटक त्याकाळी तुफान गाजलं होत. या नाटकाचे मराठी नंतर हिंदीतही बरेच प्रयोग झाले आणि या दरम्यान नानांचा हिंदी फॅन फॉलोईंगही वाढला. नाटकांमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर नाना हे बॉलिवूडमध्ये चमकू लागले. हिंदीमध्ये नानांना अधिक प्राधान्य मिळत असताना नानांजवळ गड जेजुरी या चित्रपटाची ऑफर चालून आली.
पहा नानांनी का हाकला होता एक महिना टांगा (Nana Patekar Incident)
राम कदम निर्मित गड जेजुरी हा चित्रपट होता. नानांनी या चित्रपटाची ऑफर स्वीकारली. चित्रपट संपूर्ण चित्रितही झाला मात्र काही कारणास्तव हा चित्रपट रिलीज झालाच नाही. दरम्यान या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हे जेजुरी येथे झालं. या चित्रपटात नाना पाटेकरांची भूमिका ही टांगेवाल्याची होती. या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी, त्यातील बारकावे लक्षत यावे यासाठी नाना रोज टांगा चालवण्याचा सराव करण्यासाठी जायचे. सरावासाठी तिथलाच एक टांगा त्यांनी बुक करून ठेवला होता.
गावामधून बसस्टँड, रेल्वे स्टेशन, देवीच्या देवळापाशी वैगरे अशा ठिकाणी कोणाला जायचं असेल तर नाना त्या टांग्यातून प्रवाशांची ने-आण करायचे. टिपिकल टांगेवाल्याचा वेशात असल्यानं नानांना ओळखणं फार कठीण व्हायचं. प्रवाशांची ने-आण करणारे नाना त्या प्रवासांकडून पैसे मात्र चोख घ्यायचे. दिग्दर्शक मंडळी ही नाना पाटेकरांचं टांगा चालवण्याचं कसब बघून त्यांची गंमत करायचे. पण नाना पाटेकरांनी या भूमिकेला पूर्णपणे आपलंस केलं होत. (Nana Patekar Incident)
एका टिपिकल टांगेवाल्याप्रमाणे त्यांच राहणं खाणं झालं होतं. महिनाभर डेली रुटीन आणि त्याप्रमाणे वागणे असं शेड्युलच त्यांच होतं. महिनाभर टांगा हाकुनही नाना पाटेकरांना कोणी एका प्रवासाने कधीही ओळखलं नाही, या पलीकडे आता नानांच्या अभिनयाचं उत्तम उदाहरण असूच शकत नाही. एखादे भूमिका हुबेहूब पडद्यावर मांडण्यात नाना पाटेकर तरबेज होते आणि आहेत.