ती आली तिने पाहिलं आणि जिंकून घेतलं, अशी मराठीतील वंडर गर्ल म्हणजे अभिनेत्री वर्षा उसगावकर. त्यांनी कायम आपल्या अभिनयाने, सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. मालिका,चित्रपट, नाटक अशा सर्व माध्यमातून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.आजही स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असत’. या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येतात.त्यांच्या कामाने सिनेसृष्टीमध्ये त्यांनी, त्यांचं असं एक वेगळं स्थान निर्मण केलं आहे. (Varsha Usgaonkar Father)
ब्रह्मचारी या त्यांच्या व्यावसायिक नाटकानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.आणि त्यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.९० च्या दशकातील गाजलेल्या अभिनेत्रींनमध्ये वर्षा उसगावकर हे नाव आवर्जून घेतले जाते.’गंमत जंमत’ या चित्रपटाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आणि वर्षा उसगावकर यांची एक ओळख निर्माण केली. आणि त्या नंतर त्या थांबल्याचं नाहीत.हमाल दे धमाल, सवत माझी लाडकी,यांसारखे अनेक मराठी चित्रपट त्यांनी केले.मराठी प्रमाणे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपले पाय रोवले.
पाहा काय घडलं होतं? (Varsha Usgaonkar Father)
यश मिळाल्यांनतर त्याचा गवगवा तर होतोच. पण ते मिळेपर्यंतचा प्रवास, केलेली ती सुरूवात महत्वाची असते.असाच वर्षा उसगावकर यांचा एक किस्सा जाणून घेऊया.वर्षा उसगावकर या मूळच्या गोव्याच्या. त्यांच्या घरी अभिनयाची पार्श्ववभूमी नव्हती.त्या राजकारणी घराण्यातल्या होत्या. त्यांचे वडील गोव्याचे मंत्री होते.हा किस्सा सांगताना वर्षा उसगावकर म्हणाल्या. की त्यांचे वडील स्वभावाने तसे शिस्तप्रिय होते. आणि वर्षा यांना लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचे होते. पण वडिलांना सांगायची तशी त्यांची हिंमत नव्हती.त्यांचे वडील कायम त्यांना एकच प्रश्न विचारायचे गृहपाठ झाला का?
हे देखील वाचा : ब्राम्हणी छाप असणारी ही,मुस्लिम कशी दिसणार? -राऊ मधील अश्विनींच्या भूमिकेवर झाली टीका
टिकली नाही लावली, बांगड्या नाही घातल्या कि ओरडायचे. कधी कधी तर वर्षा यांना असं वाटायचं की, माझे वडील जिथे कुठे असतील चांगले असूदेत पण घरी नसूदेत. एक दिवशी शाळा सुटल्यावर त्या शूटिंग बघत थांबल्या आणि त्यांना घरी यायला उशीर झाला, त्यावेळी त्यांचे वडील त्यांना फार रागावले. हे सगळं बघता वर्षा यांना असं वाटायचं कि आपले वडील आपल्याला कधी अभिनेत्री होऊ देणार नाहीत.अकरावी नंतर वर्षा यांच्या आईने जेव्हा त्यांच्या बाबांना सांगितलं की वर्षाला अभिनेत्री व्हायचं आहे, तेव्हा मात्र उलट घडलं. तेव्हा त्यांचे वडील स्वतः ऍक्टिंग अकॅडमी ची माहिती घेण्यासाठी पुण्याला गेले. आणि त्यांनी कधीच वर्षा यांनी अभिनेत्री होण्यापासून थांबवले नाही. बाप लेकीचं नातं असंच खास असतं.(Varsha Usgaonkar Father)