बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या चित्रपटांबरोबर विविध कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने तर आहेच. शिवाय ती जेव्हा कुठे स्पॉट होते, तेव्हा तिचा विनम्र स्वभाव चाहते आणि नेटकऱ्यांना प्रचंड भावतो. ‘आशिकी २’ चित्रपटातून पदार्पण करणारी श्रद्धा शेवटची ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटात दिसली. शिवाय ती अनेकदा विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये स्पॉट झालेली आहे. त्यावेळेस तिच्या विनम्र स्वभावाचे बरीच चर्चा होत असते. श्रद्धाचा असाच एक व्हिडीओ नुकताच समोर आला, जे पाहून चाहते तिचं कौतुक करताना दिसत आहे. (Shraddha Kapoor checking on pap after his camera lens fell)
नुकतीच श्रद्धा एका कार्यक्रमाला सहभागी झाली. या कार्यक्रमातून बाहेर पडताना श्रद्धा पापाराझींशी नेहमीप्रमाणे मराठीत बोलताना दिसली. त्यानंतर उपस्थितांशी बोलल्यानंतर ती कारच्या दिशेने गेली. त्याचवेळेस तिच्यासमोर एका पापाराझीच्या कॅमेऱ्याची लेन्स पडली. तेव्हा ती लेन्स उचलून त्या पापाराझीला दिली. पुढे तिने पापाराझीची विचारपूस करत त्या कॅमेरा लेन्सबद्दल विचारलं. त्यावेळेस त्या पापाराझीची काळजी घेण्याचं सांगताना ती म्हणाली, “इतकी महागडी लेन्स तुटली का? मी तुमच्यासाठी नवीन कॅमरा लेन्स घेऊन देते. फक्त कोणत्या कंपनीचा लेन्स आहे, हे तुम्ही मला सांगा.”
हे देखील वाचा – मानेवर मांस ठेवल्यानंतर वाघाने उडी मारली अन्…; एका सीनसाठी जीव धोक्यात ठेऊन काम करत होता बॉबी देओल, स्वतः केला खुलासा, म्हणाला, “त्याक्षणी वाघ…”
श्रद्धाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून तिच्या या कृतीवर चाहते व नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला. एक नेटकरी यावर म्हणाला, “ती खूपच विनम्र आहे.”, तर दुसरा नेटकरी म्हणाला, “याला म्हणतात माणुसकी”. एकूणच हा व्हिडीओ पाहून अभिनेत्रीचे चाहते भारावले.
हे देखील वाचा – Video : भीषण कार अपघातानंतर नवऱ्यासह पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अभिनेत्री गायत्री जोशी, आता कशी दिसते? व्हिडीओ व्हायरल
श्रद्धाच्या कामाबद्दल बोलायचं गेल्यास, ती सध्या ‘स्त्री २’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ज्यामध्ये तिच्यासह अभिनेता राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. काही दिवसांपूर्वी श्रद्धा तिच्या आलिशान कारमुळे चर्चेत आली होती.