शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : भीषण कार अपघातानंतर नवऱ्यासह पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अभिनेत्री गायत्री जोशी, आता कशी दिसते? व्हिडीओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 1, 2023 | 6:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gayatri Joshi and Vikas Oberoi spotted after car Accident

Video : भीषण कार अपघातानंतर नवऱ्यासह पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अभिनेत्री गायत्री जोशी, आता कशी दिसते?, व्हिडीओ व्हायरल

गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये फारशी सक्रिय नसलेली ‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशी काही दिवसांपूर्वी बरीच चर्चेत आली होती. गेल्या महिन्यात गायत्रीचा पती विकास ओबेरॉय यांच्या कारचा इटलीमध्ये भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये हे दोघे बालंबाल वाचले होते. मात्र त्यांच्या कारच्या धडकेत एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर काही दिवसांनी हे दोघे मायदेशी परतले होते. मात्र, ते माध्यमांसमोर फारसे झळकले नाही. अशातच या घटनेनंतर हे दाम्पत्य प्रथमच कॅमेऱ्यासमोर एकत्र आले. (Gayatri Joshi and Vikas Oberoi spotted after car Accident)

मुंबईत नुकतंच ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’चे उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला गायत्री ही पती विकाससह एकत्र आले होते. यावेळी या दोघांनी उपस्थित पापाराझींना पोझ देताना दिसून आले. या जोडीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये गायत्री व विकास हे गाडीतून उतरत समारंभासाठी निघाले. तेव्हा उपस्थित पापाराझींनी त्यांना पोझ देण्यासाठी थांबवलं. सुरुवातीला तिने पोझ दिली. त्यानंतर पतीबरोबरचा एकत्र फोटो घेतला. या सोहळ्यासाठी गायत्रीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, तर पती विकास ओबेरॉयने निळ्या रंगाचा सूट परिधान केला. या पोशाखात ही जोडी खूप सुंदर दिसून येत होती.

हे देखील वाचा – समीर चौघुलेंच्या हिंदीवरून कमेंट, हिंदीतील कलाकार आला की टीका; ‘हास्यजत्रे’च्या लेखक,दिग्दर्शकांचं रोखठोक मत, म्हणाले, “लोकांच्या भावना…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या जोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक नेटकरी यावर प्रतिक्रिया देताना दिसतात. काहींनी या जोडीचं कौतुक केलं असलं, तरी अनेकांनी त्यांना जोरदार ट्रोल केलं आहे. एक नेटकरी यावर म्हणाला, “होय, या जोडीने कॅम्पर व्हॅन चालवत असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याला मारून मायदेशी सुखरूप परतले.” एकूणच या व्हिडिओवर संमिश्र प्रतिकिया येत आहे.

हे देखील वाचा – “हे दोघे आधीच…”, अंकिता लोखंडे व विकी जैनमधील वाद खोटं असल्याचा ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांचा आरोप, म्हणाले, “तुम्ही तुमचं…”

ऑक्टोबरमध्ये हे जोडी इटलीतील एका कार शर्यतीत सहभागी झाली होती. त्यावेळी त्या जोडीच्या कारने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका व्हॅनला धडक दिली. ज्यात त्या व्हॅनमधील एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर काही दिवसांनी अभिनेत्री तिच्या पतीसह मुंबईत परतले होते. अभिनेत्रीने शाहरुख खानच्या ‘स्‍वदेस’ चित्रपटात काम केले असून या चित्रपटानंतर तिने बॉलीवूडला रामराम केला. त्यानंतर काही वर्षांनी तिने उद्योगपती विकास ओबेरॉयसह लग्न केले. अभिनेत्रीचा पती प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक असून त्यांना दोन मुले आहेत.

Tags: bollywood newsgayatri joshiGayatri Joshi and Vikas Oberoi spotted after car AccidentGayatri Joshi Car Accident Photo
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Bollywood casting meeting controversy
Entertainment

ऑडिशनला बोलावलं, चुकीचा स्पर्श केला आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “त्याने अनेक महिलांना…”

एप्रिल 17, 2026 | 10:20 am
Next Post
Onkar Bhojane Incident

ओंकार भोजनेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडल्यानंतरही त्याची 'ती' गोष्ट विसरु शकले नाहीत दिग्दर्शक-निर्माते, म्हणाले, "त्यावेळी मानधन वाढवलं असताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.