शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेत लवकरच येणार नवं वळण?, अभिनेत्रीचा आगीबरोबर शूट करतानाचा थरारक BTS व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 6, 2024 | 1:21 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
actress shilpa navalkar shared bts video of tharla tar mag serial on Instagram

Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेत लवकरच येणार नवं वळण?, अभिनेत्रीचा आगीबरोबर शूट करतानाचा थरारक BTS व्हिडीओ व्हायरल

स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिओक अनेकदा वरचढ ठरल्याचे दिसून आले आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेबरोबरच मालिकेतील कलाकारांचं ही सर्वत्र कौतुक होत आहे. या मालिकेतील कलाकार हे नेहमीच पडद्यामागील घटना, प्रसंग किंवा काही दृश्ये प्रेक्षकांबरोबर शेअर करत असतात. अशातच अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी या मालिकेमधील शूटिंगदरम्यानचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. (

शिल्पा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधून एका सीनसाठी कलाकारांसह इतर तंत्रज्ञ मंडळी किती मेहनत घेतात हे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा यांच्या एका सीनचे शूट होत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा यांना जखम झाल्याचे दाखवण्यात आले आहेत. या व्हिडीओमधून मेकअप टीमचे कौशल्य दिसत आहे. शिल्पा यांच्या हाताला व डोक्याला रक्ताने भरलेल्या जखमा दिसत आहेत. हे दृश्य खोटे असले तरी त्यात खरेपणा आणण्यासाठी कलाकारांसह तंत्रज्ञ मंडळींची मेहनत व कौशल्य दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Navalkar (@shilpanavalkarofficial)

आणखी वाचा – “आमच्या लग्नाची तारीख…”, शिवानी सुर्वेबरोबर लग्ना करण्याबाबत पहिल्यांदाच बोलला अजिंक्य ननावरे, म्हणाला, “आनंदाची बातमी…”

तसेच या व्हिडीओमध्ये पुढे आगीची काही भयानक दृश्येदेखील पआहायला मिळत आहे. यात अभिनेत्री आगीत अडकल्याचे दिसून येत आहे. या सीनमध्ये शिल्पा भयभीत झालेल्या पाहायला मिळत आहे. मालिकेतील कलाकार व इतर तंत्रज्ञ मंडळी पडद्यावर उत्तम चित्र रेखाटलं जावं म्हणून अहोरात्र मेहनत घेत असतात आणि तीच मेहनत या व्हिडीओमधून दिसत आहे.  कॅमेरामॅन आगीच्या मागून कॅमेरा घेऊन शिल्पा यांना कॅमेऱ्यात कैद करत असल्याचेही या व्हीडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ठरलं तर मग’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. शिल्पा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : महाबळेश्वरमध्ये शेतात नवऱ्यासह काम करतेय मृण्मयी देशपांडे, स्ट्रॉबेरीचीही करतात शेती, व्हिडीओ शेअर करत दाखवली संपूर्ण झलक

दरम्यान, या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच शिल्पा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये कलाकारांचे व तंत्रज्ञाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर आगामी भागात हा सीन कधी पाहायला मिळणार? यासाठी कमेंट्सद्वारे उत्सुकताही व्यक्त केली आहे.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainmentMarathi newsmarathi serialshilpa navalkarTharla Tar Magठरलं तर मगमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीमराठी मालिकाशिल्पा नवलकर
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
maharashtrachi hasyajtra fame namrata sambherao shared video of a girl portraying her famous lolly character

Video : भाचीनेच केली नम्रता संभेरावची हुबेहूब नक्कल, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘लॉली’ पात्र साकारलं अन्...; व्हिडीओ व्हायरल  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.