सध्या मनोरंजन विश्वात लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. २०२३ या वर्षात मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. आमिर खानची लेक आयरा खानदेखील बॉयफ्रेंड नूपुर शिखरेबरोबर नुकतीच विवाहबंधनात अडकली. गेल्याच महिन्यात प्रथमेश-मुग्धा, स्वानंद-गौतमी, स्वानंदी-आशिष, सोनल-समीर, सुरुची-पियुष या लोकप्रिय मराठी कलाकारांनी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली. अशातच आता मराठीतील आणखी एक जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. ही लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे. (Ajinkya Nanaware Talk On His Marriage)
गेल्या अनेक वर्षांपासून शिवानी व अजिंक्य हे दोघे रिलेनशिपमध्ये आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता येत्या नवीन वर्षात हे दोघे विवाहबांधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिवानी व अजिंक्य यांनी अनेकदा त्यांचे एकमेकांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. नुकताच शिवानीने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याविषयीचा खुलासा केला होता. तर अजिंक्यनेही नुकत्याच शेअर एका केलेल्या फोटोवरील कॅप्शनमुळे त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली असल्याचे म्हटले जात आहे. अशातच अभिनेत्याने पुन्हा एकदा त्याच्या लग्नाविषयी भाष्य केले आहे.
अभिनेता अजिंक्य ननावारेने नुकत्याच इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत लवकरच त्यांचे लग्न होणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेत्याला येत्या नवीन वर्षात तु लग्नबंधनात अडकणार आहेस का?” असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा उत्तर देत अजिंक्यने असे म्हटले की, “लवकरच आम्ही आमच्या लग्नाची तारीख जाहीर करणार आहोत. येत्या नवीन वर्षात आम्ही सर्वांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर करणार आहोत. ही तारीख आम्ही व्यवस्थितपणे नियोजन करुन अधिकृतपणे जाहीर करणार आहोत.”
दरम्यान, अजिंक्य हा सध्या झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याची ही भूमिका चाहत्यांन खूपच आवडते. तर झिम्मा २ या चित्रपटामधील शिवानी सुर्वेही भूमिकादेखील चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली होती. अशातच ही जोडी आता लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.