बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : महाबळेश्वरमध्ये शेतात नवऱ्यासह काम करतेय मृण्मयी देशपांडे, स्ट्रॉबेरीचीही करतात शेती, व्हिडीओ शेअर करत दाखवली संपूर्ण झलक

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 6, 2024 | 11:51 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
actress mrunmayi deshpande harvesting in the field with her husband swapnil rao video shared on instagram

Video : महाबळेश्वरमध्ये शेतात नवऱ्यासह काम करतेय मृण्मयी देशपांडे, स्ट्रॉबेरीचीही करतात शेती, व्हिडीओ शेअर करत दाखवली संपूर्ण झलक

मराठी मालिका, चित्रपट यातून अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. मृण्मयीने आजवर रीअॅलिटी शोजचे सूत्रसंचालनदेखील केले आहे. मृण्मयी देशपांडे व तिचा पती स्वप्नील राव ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील अनुरूप जोडी समजली जाते. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. मृण्मयी व स्वप्निल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. एकमेकांबरोबचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. या दोघांना फिरण्याचीही प्रचंड आवड आहे. (Mrunmayee Deshpande On Instagram)

गेल्या काही वर्षांपासून मृण्मयी शेती करण्यात रमली आहे. अभिनयातून मोकळं वेळ मिळाला की ती तिच्या पतीबरोबर महाबळेश्वर येथे शेती करत असते. मृण्मयी व तिचा पती २०२० पासून मुंबई सोडून महाबळेश्वर येथे राहत आहे. त्यांनी महाबळेश्वरला छोटंसं टुमदार घरही बांधलं आहे. ती अनेकदा तिचे तिच्या शेतातले फोटो व व्हिडिओही चाहत्यांसह शेअर करत असते. त्यानंतर आता तिने शेतीपूरक व्यवसायही सुरू केला आहे. अशातच तिने नुकतच एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande – Rao (@mrunmayeedeshpande)

आणखी वाचा – गाणगापूर, अक्कलकोट अन्…; आदेश बांदेकरांचे कुटुंबासह ट्रेनने देवदर्शन, फोटो शेअर करत म्हणाले “आनंदयात्रेचा…”

मृण्मयीने तिच्या पतीबरोबरचा शेतीमधला एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडीओमध्ये तिने असे म्हटले आहे की, “जेव्हा तुम्ही शेती करत असता तेव्हा तुमच्या पूर्ण शरीराचं व्यायाम होतो. तर जिममध्ये तुम्ही कसरत का करावी? कापणी हा खूपच चांगला व्यायाम आहे. शेतात काम करत असताना जिमची कुणालाच गरज नाही” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओमध्ये मृण्मयीचा पती स्वप्नील हा शेतात कापणी करत असतानाच स्कॉट कसे मारले जातात? याचे प्रात्यक्षिकदेखील करुन दाखवत आहे.  

आणखी वाचा – “आगीत तेल ओततात पण…”, ‘बिग बॉस’ स्क्रिप्टेड असण्याच्या चर्चांवरुन पुष्कर जोगचा खुलासा, म्हणाला, “त्या घरात…”

दरम्यान, नुकताच गौतमीचा विवाहसोहळा पार पडला असून या लग्नात बहीण म्हणून मृण्मयीने खूपच धमाल केली. गौतमी-मृण्मयी या बहिणीची केमिस्ट्री ही खूपच कमाल असल्याचे आजवर अनेकदा पाहायला मिळाले आहे. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच मृण्मयीच्या या व्हिडीओचीदेखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून मृण्मयी सध्या निसर्गसानिध्यात शेतीचा आनंद अनुभवत आहे.  

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainmentMarathi newsMrunmayee Deshpande swapnil raoमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनमृण्मयी देशपांडेस्वप्नील राव
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Next Post
satvya mulichi satavi mulgi fame actor ajinkya nanaware talked about his marriage with shivani surve see the details

"आमच्या लग्नाची तारीख…", शिवानी सुर्वेबरोबर लग्ना करण्याबाबत पहिल्यांदाच बोलला अजिंक्य ननावरे, म्हणाला, "आनंदाची बातमी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.