स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिओक अनेकदा वरचढ ठरल्याचे दिसून आले आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेबरोबरच मालिकेतील कलाकारांचं ही सर्वत्र कौतुक होत आहे. या मालिकेतील कलाकार हे नेहमीच पडद्यामागील घटना, प्रसंग किंवा काही दृश्ये प्रेक्षकांबरोबर शेअर करत असतात. अशातच अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी या मालिकेमधील शूटिंगदरम्यानचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. (
शिल्पा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधून एका सीनसाठी कलाकारांसह इतर तंत्रज्ञ मंडळी किती मेहनत घेतात हे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा यांच्या एका सीनचे शूट होत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा यांना जखम झाल्याचे दाखवण्यात आले आहेत. या व्हिडीओमधून मेकअप टीमचे कौशल्य दिसत आहे. शिल्पा यांच्या हाताला व डोक्याला रक्ताने भरलेल्या जखमा दिसत आहेत. हे दृश्य खोटे असले तरी त्यात खरेपणा आणण्यासाठी कलाकारांसह तंत्रज्ञ मंडळींची मेहनत व कौशल्य दिसून येत आहे.
तसेच या व्हिडीओमध्ये पुढे आगीची काही भयानक दृश्येदेखील पआहायला मिळत आहे. यात अभिनेत्री आगीत अडकल्याचे दिसून येत आहे. या सीनमध्ये शिल्पा भयभीत झालेल्या पाहायला मिळत आहे. मालिकेतील कलाकार व इतर तंत्रज्ञ मंडळी पडद्यावर उत्तम चित्र रेखाटलं जावं म्हणून अहोरात्र मेहनत घेत असतात आणि तीच मेहनत या व्हिडीओमधून दिसत आहे. कॅमेरामॅन आगीच्या मागून कॅमेरा घेऊन शिल्पा यांना कॅमेऱ्यात कैद करत असल्याचेही या व्हीडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ठरलं तर मग’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. शिल्पा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच शिल्पा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये कलाकारांचे व तंत्रज्ञाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर आगामी भागात हा सीन कधी पाहायला मिळणार? यासाठी कमेंट्सद्वारे उत्सुकताही व्यक्त केली आहे.