शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : भाचीनेच केली नम्रता संभेरावची हुबेहूब नक्कल, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘लॉली’ पात्र साकारलं अन्…; व्हिडीओ व्हायरल  

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 6, 2024 | 2:24 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
maharashtrachi hasyajtra fame namrata sambherao shared video of a girl portraying her famous lolly character

Video : भाचीनेच केली नम्रता संभेरावची हुबेहूब नक्कल, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘लॉली’ पात्र साकारलं अन्...; व्हिडीओ व्हायरल  

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने गेली ४-५ वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांनी या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारावर प्रेम केले आहे. या कार्यक्रमामधील प्रत्येक कलाकार आणि त्या कलाकाराने साकारलेले पात्र चाहत्यांच्या विशेष आवडीचे झाले आहेत. एखाद्या लोकप्रिय पात्राचे स्किट बरेच दिवस सादर झाले नाही, तर प्रेक्षक सोशल मीडियाद्वारे त्या पात्राविषयी विचारणा करताना दिसतात. हास्यजत्रा मधील  अनेक लोकप्रिय पात्रांपैकी एक खूप लोकप्रिय पात्र म्हणजे ‘लॉली’. (Namrata Sambherao On Instagram)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील नम्रता संभेराव ही अभिनेत्री ‘लॉली’ हे पात्र साकारते. सचिन गोस्वामी व प्रसाद खांडेकर यांच्या लेखणीतून लॉली हे पात्र साकारले गेले असून अभिनेत्रीने तिच्या अभिनयामुळे हे पात्र आणखी फुलवले आहे. त्यामुळे या पात्राची सोशल मीडियासह अनेक प्लॅटफॉर्म्सवर लोकप्रियता पाहायला मिळते. सोशल मीडियावर लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांमध्ये या लॉली पात्राची क्रेझ पाहायला मिळते. अशातच नम्रता संभेरावच्या लॉली या पात्राचा आणखी एक् व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

आणखी वाचा – Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेत लवकरच प्रतिमाची होणार एण्ट्री?, अभिनेत्रीचा आगीबरोबर शूट करतानाचा थरारक BTS व्हिडीओ व्हायरल

नम्रताने तिच्या सोशल मीडियावर हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी तिच्या लॉली पात्राचे एक आगळेवेगळे प्रहसन केले आहे. यात ती एक शिक्षिका झाली असून शिक्षिकेच्या भूमिकेद्वारे तिने लॉली हे पात्र साकारले आहे. नम्रताची हुबेहूब नक्कल करत तिने हे प्रहसन सादर केले आहे. या व्हिडीओमधील ही मुलगी नम्रताची भाची असल्याचे म्हटले जात आहे. नम्रताने हा व्हिडीओ शेअर करत याखाली असे लिहिले आहे की, “निरागसता, माझी माऊ किती मोठी झाली मावशीचा अभिनय करायला लागली. तू खूप भारी काम केलं आहेस. खूप मोठी हो”

आणखी वाचा – Video : महाबळेश्वरमध्ये शेतात नवऱ्यासह काम करतेय मृण्मयी देशपांडे, स्ट्रॉबेरीचीही करतात शेती, व्हिडीओ शेअर करत दाखवली संपूर्ण झलक

दरम्यान, नम्रताने शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी “खूप छान, एक नंबर, किती गोड, जबरदस्त, खूपच कमाल, अगदी छोटी नम्रता वाटतेय” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओमधील मुलीचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर अनेक हसण्याचे इमोजीद्वारे त्यांना हा व्हिडीओ आवडल्याचेही म्हटले आहे.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
tharla tar mag fame actress jui gadkari shared cute video with little girl on social media

Video : घरच्या अंगणात भजन सुरु असताना बहिणीच्या मुलीला सांभाळताना दिसली जुई गडकरी, म्हणाली, "मावशी ड्युटी अन्..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.