गुरूवार, ऑगस्ट 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…म्हणून पहिल्या पतीबरोबर रेणुका शहाणेंचा झाला घटस्फोट, आशुतोष राणा यांच्याबरोबर दुसरं लग्न केलं कारण…

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 7, 2023 | 8:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Renuka Shahane Ashutosh Rana Wedding

…म्हणून पहिल्या पतीबरोबर रेणुका शहाणेंचा झाला घटस्फोट, आशुतोष राणा यांच्याबरोबर दुसरं लग्न केलं कारण…

मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणेने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला खरी ओळख मिळाली ती सलमान खानच्या ‘हम आपके हैं कौन’ चित्रपटामुळे. रेणुका यामध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली होती. पण तिच्या या भूमिकेमुळेच ती प्रसिद्धीच्या झोतात आली. अभिनेत्रीने २००१ मध्ये अभिनेता आशुतोष राणा यांच्याशी लग्न केले. तिचे हे दुसरे लग्न होते. पण दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळी असल्यामुळे हे लग्नही टिकणार नाही, असे अनेकांनी तिला सांगितले होते. आज त्यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली, पण दोघांचं हे बॉण्डिंग आजही चांगलं आहे. नुकताच अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल बोलली आहे. (Renuka Shahane Ashutosh Rana Wedding)

रेणुकाने नुकतंच मिड डेला एक मुलाखत दिली होती. ज्यात ती तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलली. शिवाय, तिच्या पहिल्या पतीबद्दलही मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने यावेळी सांगितलं की, जेव्हा तिचं दुसरं लग्न पार पडलं. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी हे लग्न टिकणार नसल्याचे सांगितले होते. कारण दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळी होती. रेणुका महाराष्ट्राची होती, तर तिचा पती मध्यप्रदेशचा होता. पण त्यांचं कुटुंब मोठं असल्याने ती या घरात व संस्कृतीशी जुळणार का? याची चिंता तिच्या घरच्यांना वाटत होती.

हे देखील वाचा – गाय आडवी आली, पावसामुळे पूल वाहून गेला अन्…; तेव्हा आदेश बांदेकरांनी अनुभवला दैवी चमत्कार, म्हणाले, “घोंगडी घातलेला व्यक्ती…”

पण जेव्हा रेणुका आशुतोष राणा यांच्याशी दुसरं लग्न करणार होती. यासाठी तिला खूपच काळजी घायवी लागली होती. अखेर खूप विचार केल्यानंतर अभिनेत्री लग्नाला तयार झाली. तिला असं वाटत होतं की, लग्न एक जुगारासारखं असून हे लग्न टिकणार का? याची शाश्वतीसुद्धा नव्हती. चांगले मित्र कधीच चांगले सोबती होऊ शकत नाही, असे तिला वाटत होते. पण तरीही तिने आशुतोष राणाशी लग्न केले. लग्नानंतर तिने तिथल्या कुटुंब आणि संस्कृतीची ओळख करून घेतली. आणि ती या कुटुंबाशी एकरूप झाली.

हे देखील वाचा – Video : “पती-पत्नी असणं महत्त्वाचं नाही कारण…”, ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा नवा रिल व्हिडीओ चर्चेत

View this post on Instagram

A post shared by Renuka Shahane (@renukash710)

रेणुकाचं हे दुसरं लग्न असून तिचे पहिले लग्न नाट्य लेखक व दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी झाले होते. मात्र, हे नातं फार काळ टिकल्यामुळे दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार असं सांगण्यात येतं की, विजय यांना रेणुकाने केवळ मराठी चित्रपटात काम करावे, असे वाटत होते. त्याचबरोबर दोघांमध्ये सतत वाद होत असल्यामुळे दोघांनी परस्पर समंतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पतीपासून वेगळे झाल्यानंतर तिने पुढे आशुतोष राणा यांच्याशी लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुलं असून दोघांचा संसार अगदी आनंदाने सुरु आहे.

Tags: ashutosh ranabollywood newsrenuka shahaneRenuka Shahane Ashutosh Rana Wedding
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Monsoon Kitchen Tips
Lifestyle

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

ऑगस्ट 19, 2026 | 11:19 am
Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Next Post
swapnil joshi share a video

लंडनमधील थंडीमुळे ‘अशी’ झाली कलाकारांची अवस्था, व्हिडिओ शेअर करत स्वप्निल जोशी म्हणाला, “पॅकअपनंतर जेवायला गेलो आणि…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.