सध्या सोशल मीडियाच्या या जमान्यात आपल्याला अनेक ट्रेंडिंग रिल्स, व्हिडीओज पाहायला मिळतात. या रिल्समधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते. मराठी मनोरंजनविश्वातील कलाकार मंडळीही सोशल मीडियावर सक्रिय आहे. ते या माध्यमातून फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. शिवाय, व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत कलाकार त्यांचे रिल व्हिडीओ शूट करत ते शेअर करताना दिसतात. रिलद्वारे चाहत्यांचं मनोरंजन करणं, हा नवा ट्रेंड आता सुरु झाला असून मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन जोडपं अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकरही यामध्ये काही मागे नाहीत. सोशल मीडियावर या जोडीचे अनेक रिल्स सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे. (Aishwarya and Avinash Narkar new Reel)
ऐश्वर्या सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेमध्ये रुपालीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. तर अविनाश यांची ‘३६ गुणी जोडी’ मालिकेतील कामसुद्धा उल्लेखनीय आहे. हे दोघेही त्यांच्या व्यग्र कामामधून वेळ काढत विविध व्हिडीओ तयार करतात. तसेच रिल्समधून चाहत्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. कधी त्यांच्या व्हिडिओचे कौतुक होते, तर कधी त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. अशातच त्यांनी नुकतीच एक रिल पोस्ट केली, ज्याची जोरदार चर्चा होत आहे.
हे देखील वाचा – गाय आडवी आली, पावसामुळे पूल वाहून गेला अन्…; तेव्हा आदेश बांदेकरांनी अनुभवला दैवी चमत्कार, म्हणाले, “घोंगडी घातलेला व्यक्ती…”
ऐश्वर्याने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक रिल शेअर केला आहे. ज्यामध्ये ती अविनाश नारकरांसह थिरकताना दिसते. दोघांनी यावेळी पारंपारिक वेशभूषा केली असून ते यामध्ये सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी दिलेलं कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ऐश्वर्या या पोस्टमध्ये म्हणते, “Couple goals… बदल हा तुमच्या आयुष्याचा भाग आहे, फक्त तो चांगला बनण्याचा प्रयत्न करा. एकमेकांशी संवाद साधा, त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. जे तुमच्यासाठी चांगले आहे ते मिळवा. कोणत्याही स्थितीत तुम्ही एकमेकांना साथ द्या, त्यांचे मित्र व्हा. तुम्ही पती-पत्नी असणं महत्त्वाचं नाही. कारण, हे आयुष्य नक्कीच तुम्हाला आनंदाच्या वाटेवर घेऊन जाईल.” तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून चाहते कमेंटद्वारे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – “कौतुकाने खायला थांबले पण…”, भूक लागलेली असताना ‘श्री दत्त स्नॅक्स’ने दिलेले पोहे बघूनच भडकली मुक्ता बर्वे, म्हणाली, “पैसे गेल्याचं दुःख…”
“मोबाईल त्यांचा, आनंद त्यांचा. ज्याला नसेल आवडत त्यांनी बघू नका. पण इतक्या ज्येष्ठ नटाला असं बोलू नका.”, अशी विनंती एक नेटकऱ्याने केली. तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनले आहात. असे क्षण क्वचितच पाहायला मिळतात.”, अशी कमेंट आणखी एका नेटकऱ्याने केली आहे. या पोस्टमधून तिने पती अविनाशवर होत असलेल्या ट्रोलिंगला उत्तर देताना ट्रोलर्सना खडेबोल सुनावले असून त्याची जोरदार चर्चा होत आहे.