मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे स्वप्निल जोशी. स्वप्निलने आतापर्यंत बऱ्याच मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. अनेकदा तो कामासह वैयक्तिक आयुष्यातील फोटोज् व व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतो. सध्या तो आगामी चित्रपट ‘इंद्रधनुष्य’च्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये होता. नुकताच त्याने तिथला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (swapnil joshi share a video)
स्वप्निलसह इतर कलाकारही ‘इंद्रधनुष्य’ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी लंडनमध्ये होते. त्यात लंडनमधील कडाक्याची थंडी. या थंडीमुळे लंडनमध्ये थंडीत कालाकरांची काय अवस्था झाली हे या व्हिडिओत दिसत आहे. अभिनेत्री सुकन्या मोने, अदिती सरंगधार, नम्रता गायकवाड, प्रार्थना बेहरे या लंडनच्या रस्त्यावर चालताना दिसत आहेत. हे कलाकार थंडीमुळे कोणाची कशी अवस्था आहे याची नक्कल करत मजामस्ती करतानाही दिसत आहेत.
या व्हिडिओला कॅप्शन देत स्वप्निल लिहीतो, “काय बोलतोय ते बेसिक आहे; पण किती आनंदी आहोत ते दृष्ट लागण्यासारखं आहे! खूब जमेगा रंग जब मिल बैठे कुछ यार… लंडनमध्ये एका संध्याकाळी कुडकुडणाऱ्या थंडीत, पाय गारठलेले असताना, packup नंतर जेवायला गेलो आणि इतके हसलो, इतके हसलो की सगळ्यांच आयुष्य वाढलं ! निखळ मित्र; निखळ मैत्री; निखळ हास्य…बस अजून काय लागतं!” असं लिहीत त्याने लंडनची थंडी आणि त्यातही त्यांनी शोधलेलं निखळ हास्य याबाबत लिहिलं.
हा व्हिडिओ शेअर करत त्याने अभिनेता सागर कारंडे, अभिनेत्री दिप्ती देवी, नेहा खान यांना टॅग करत यासगळ्या मस्तीत त्यांना मिस करत असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने, ‘कहा ऐसा याराना, खूप गोड. कोणाची नझर नको लागालला’, असं म्हणत त्यांच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘तुम्हाला सगळ्यांना बघून मस्त वाटलं पण स्वप्नील सर तुम्ही दिसला नाहीत’, अशी कमेंट केली आहे.