पारंपारीक,ग्लॅमर्स.बोल्ड अशा सर्व छटा असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिच्या अभिनयाने, सौंदर्याने तिने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अनेक चित्रपट ,मालिका, वेबसिरीज अशा सर्व माध्यमांत तिने तिच्या कामाची छाप पडली.कोणत्याही एका पद्धतीच्या भूमिकेत अडकून न राहता, तीची वेगवेगळी रूप बघायला मिळतात.जुळून येती रेशीमगाठी मध्ये तीच सोज्वळ रूप बघायला मिळालं, तर नकटीच्या लग्नाला या मालिकेत प्राजक्ताचा वेगळाच अंदाज बघायला मिळाला.(Prajakta Mali wedding)
काम करताना आयुष्यात जोडीदार असावा, असं प्रत्येकालाच वाटत. आपलं काम समजून घेणारा, आपल्या पाठीशी उभा रहाणार, खंबीर साथ देणारा जोडीदार हवा अशा प्राथमिक अपेक्षा सर्वांच्याच असतात.आणि ही गोष्ट कलाकारांच्या बाबतीतही काही वेगळी नसते.कलाकारांच्या लग्नाविषयी, त्यांचे क्रश कोण आहेत. त्यांना कसा जोडीदार हवा या बदल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात.त्यात प्राजक्ता वर क्रश असणारे तिचे अनेक चाहते आहेत.काही दिवसांपूर्वी प्राजक्ताला अभिनेता वैभव तत्ववादी सोबत लग्न करायचं अशा चर्चाना उधाण आलं होत.
पाहा काय म्हणाली प्राजक्ता? (Prajakta Mali wedding)
प्राजक्ताने इट्स मज्जा ला दिलेल्या एका मुलाखतीत तिला कसा मुलगा हवा आहे याबद्दल भाष्य केलं आहे. तेव्हा प्राजक्ताला तीन अभिनेत्यांच्या नावाचा पर्याय देण्यात आला होता, सुव्रत जोशी, ललित प्रभाकर आणि प्रसाद ओक. तेव्हा प्राजक्ताने मी प्रसाद ओकशी लग्न करेन असं म्हंटल होतं, तेव्हा प्राजक्ताला कारण विचारल्यावर प्राजक्ता म्हणाली,मला कायमच वयाने मोठी मंडळी आवडतात.(Prajakta Mali wedding)
सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने सगळीकडे हास्यधुमाकूळ घातला आहे, शोची, कलाकारांची जेवढी चर्चा असते, तेवढीच या शोच्या निवेदकाची असते. कारण ही जबाबदारी प्राजक्ताने अगदी उत्तम सांभाळी आहे. या शो मध्ये प्राजक्ताचे वेगवेगळे लूक्स बघायला मिळतात.आणि सगळ्या लूक्स मध्ये प्राजक्ता फार सुंदर दिसते.तसेच वेगवगळ्या फोटोशूटमुळे देखील प्राजक्ता कायमच चर्चेत असते. अभिनयासोबतच प्राजक्ताने स्वतःचा व्यवसाय देखील सुरु आहे.
हे देखील वाचा : प्राजक्ता माळीच बोल्ड फोटोशूट होतयं वायरल