शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सायली-अर्जुन लपवू शकतील का कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य?, सुभेदार कुटुंबाला मिळाला खूप मोठा धक्का, मालिकेत रंजक वळण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 7, 2024 | 10:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag Promo

सायली-अर्जुन लपवू शकतील का कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य?, सुभेदार कुटुंबाला मिळाला खूप मोठा धक्का, मालिकेत रंजक वळण

टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेल्या मालिकांच्या यादीत एका मालिकेचे नाव आवर्जून घेतले जाते ते म्हणजे ‘ठरलं तर मग’. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. ही मालिका जेव्हापासून सुरु झाली तेव्हापासून या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवले आहे. तसेच या मालिकेतील कलाकारांवरही प्रेक्षक खूप प्रेम करताना दिसतात. अशातच मालिकेत सायली व अर्जुन या पात्राला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेत सध्या येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. (Tharal Tar Mag Promo)

सायली व अर्जुन यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं हे सत्य आता हळूहळू उघडकीस येताना पाहायला मिळत आहे. सायली व अर्जुन यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असल्याचं सत्य लग्न झाल्यापासून सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं असतं. मात्र ही गोष्ट फक्त चैतन्यला माहीत असते. मध्यंतरी अर्जुन व चैतन्य यांच्यात वाद झाला तेव्हा चैतन्य रागाच्या भरात सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची गोष्ट साक्षीला सांगितलेली असते त्यामुळे साक्षी ही गोष्ट प्रियाला सांगते आणि सांगते की, आता तू सायली व अर्जुन यांचं खरं प्रेम नाही आहे. त्या दोघांनी लग्न देखील केलेले नाही ही गोष्ट तू जाऊन पूर्णा आजीला सांग.

आणखी वाचा – आयुष्मान योगामुळे मेष राशीसह ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, नोकरी-व्यवसायातही मिळेल यश, जाणून घ्या…

View this post on Instagram

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

त्यानंतर प्रिया सुभेदाराच्या घरी जाऊन सगळं काही सांगते. ते ऐकून पूर्णा आजीचा पारा चढतो आणि पूर्णा आजी जाब विचारायला सायलीकडे येते. त्यानंतर पूर्णा आजी सायलीच्या हाताला धरून तिला देवघरात घेऊन जाते आणि देवासमोर शपथ घ्यायला लावते की, तुझं आणि अर्जुनच खरं प्रेम आहे आणि तुमचं लग्न झालं आहे अशी शपथ घे. तेव्हा सायली देवघरात जाते आणि देवासमोर शपथ घेत म्हणते की माझा आणि यांचं लग्न झालं आहे आणि माझं यांच्यावर खूप प्रेम आहे. ही गोष्ट पाठीमागे उभा राहून अर्जुनदेखील पाहत असतो. तर सायलीने तर एकतर्फी प्रेमाची कबुली दिलेली असते. त्यामुळे अर्जुनला धक्काच बसलेला असतो.

आणखी वाचा – अहिल्यादेवींनी पारू व दामिनीला सुनावली शिक्षा, दामिनी घर सोडून जाणार का?, पारूसाठी मुलगा बघितल्याचं मारुतीला सांगितलं अन्…

समोर आलेल्या प्रोमोमध्ये अर्जुन घराबाहेर येतो आणि चैतन्यला फोन लावून म्हणतो की, पूर्णा आजीला आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा संशय आला आहे. पूर्णा आजीने सायलीला देवासमोर शपथ घ्यायला देखील लावली तेव्हा चैतन्य विचार करू लागतो. तर इकडे स्मिता कल्पना आणि सायली बसलेल्या असतात. तेव्हा कल्पना म्हणते तुमच्या प्रेमावर संशय घेऊन पूर्णा आईने जरा अतिरेकच केला. यावर स्मिता म्हणते की, सायली व अर्जुनने तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे म्हणून तू असा विचार करत आहेस. आता सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य सर्वांसमोर येणार का?, की सायली अर्जुन आता हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कसं लपवणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialstar pravahtharal tar magTharal Tar Mag PromoTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Subodh Bhave On wife

३३ वर्षांपूर्वीचा सुबोध आला समोर, अभिनेत्याने रोमँटिक व्हिडीओ शेअर करत सांगितली आठवण, म्हणाला, "मी मंजिरीला प्रपोज केलं अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.