‘विठू माऊली तू, माऊली जगाची..’ हे गाणं मोठ्या भक्तिभावाने गात महाराष्ट्रातील लाखो भाविक आषाढी एकादशीला आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीस येत असतात. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन होत हे भाविक दिवसरात्र कशाचाही मोह न करता निष्पाप भावनेने वारीचा आनंद लुटताना दिसतात. (Upcoming New Marathi Movie)
विठ्ठलाच्या एका भेटीसाठी या भाविकांना आसुसलेलं पाहून नेहमीच रंजक ठरत. अशातच वारीचं औचित्य साधत ‘विठ्ठल माझा सोबती’ हा चित्रपट भाविकांच्या भेटीस येणाया सज्ज होत आहे. फक्त मराठी आणि नाईंटी नाईन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विठ्ठल माझा सोबती’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून हा चित्रपट येत्या २३ जूनला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
पाहा संदीप पाठकचा नवा सिनेमा कोणता आहे (Upcoming New Marathi Movie)
‘विठ्ठल माझा सोबती’ हा चित्रपट पांडुरंगाच्या एका निस्सीम भक्तावर आधारित आहे. ज्या कुटुंबात पैसा आहे पण नात्यांत गोडवा नाही अशा एका श्रीमंत कुटुंबात घडलेली कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अशातच कुटुंबातील क्लेशाला कंटाळलेल्या भक्ताच्या आयुष्यात एक साधारण ‘विठ्ठल’ नामक मदतनीस येतो. ‘विठ्ठल’च्या येण्याने नेमकी काय जादू घडते? त्या भक्ताच्या घरातील सदस्यांमधील मतभेद दूर होतात का? हा ‘विठ्ठल’ नेमका आहे तरी कोण आणि कुठून आला? या आणि अशा रंजक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘विठ्ठल माझा सोबती’ पाहायलाच हवा.(Upcoming New Marathi Movie)
पल्लवी मळेकर (फक्त मराठी) निर्मित आणि संदीप मनोहर नवरे’ दिग्दर्शित ‘विठ्ठल माझा सोबती’ या चित्रपटात अरुण नलावडे, संदीप पाठक, राजेंद्र शिरसाटकर, आशय कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, दिव्या पुगांवकर, अभय राणे यांसारख्या दर्जेदार कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळतील. या चित्रपटाची उत्कंठावर्धक कथा संदीप मनोहर नवरे यांनी लिहिली असून पटकथा-संवाद विक्रम एडके यांचे आहेत.
हे देखील वाचा – पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार शिवाली
भक्तिरसात तल्लीन करणारा ‘विठ्ठल माझा सोबती’ प्रेक्षकांना, भाविकांना निर्मळ आनंद देण्यात नक्कीच यशस्वी ठरेल.