Majjacha Adda with Ashok Saraf : मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ गेली बरीच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अभिनय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या या जोडीचे लाखो चाहते दिवाने आहेत. अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता जोशी-सराफ यादेखील एक अभिनेत्री असून त्यांनीही मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. निवेदिता या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. अनेक आठवणी, किस्से व फोटो शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
निवेदिता यांचा सोशल मीडियावरील वावर पाहता याउलट अशोक सराफ हे सोशल मीडियापासून दूर असलेले पाहायला मिळत आहेत. फेसबुक, व्हॉट्सऍप यांसारख्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशोक सराफ नाही आहेत. वा ते कोणतंही सोशल मीडिया वापरणं टाळतात. आजच्या या डिजिटल युगापासून अशोक मामा दूर असलेले पाहायला मिळत आहे. याउलट त्यांच्या पत्नी निवेदिता या डिजिटल जगतात बऱ्याच सक्रिय असलेल्या पाहायला मिळत आहेत.
अशोक सराफ यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी सोशल मीडियाबरोबर त्यांच्या असलेल्या नात्याबद्दल भाष्य केलं. यावेळी बोलताना अशोक सराफ म्हणाले, “सोशल मीडियाचा वापर मी अजिबात करत नाही. फेसबुक, व्हॉट्सऍप मी वापरत नाही. माझ्या फोनमध्ये काहीही नाही. फोन आला कोणाचा तर घ्यायचा, समोरच्या व्यक्तीला फोन करायचा, मॅसेज करायचा याच्यापलिकडे मी फोनमध्ये काहीही करत नाही. या असल्या फालतू गोष्टींमध्ये मी शिरतच नाही. सोशल मीडियाकडे मी कधी बघितलंच नाही. त्याकडे माझं लक्षच नसतं” असं ते म्हणाले.
अशो सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ या इंस्टाग्राम, फेसबुकवरुन चाहत्यांच्या संपर्कात राहतात. चाहत्यांसह नेहमीच त्या काही ना काही शेअर करत असतात. चाहतेही निवेदिता यांच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. याशिवाय निवेदिता यांचं स्वतःच युट्युब चॅनेलही आहे. त्या युट्युब चॅनेलवरून त्या खवय्यांसाठी वेगवेगळ्या रेसिपी शेअर करताना दिसतात. या प्लॅटफॉर्मवरही निवेदिता यांना भरभरून प्रतिसाद मिळतो.