झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. दरम्यान या मालिकेत खलनायिका भूमिका साकारलेल्या विक्रम म्हणजेच ध्रुव दातारने नुकतीच एक आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. अभिनेता ध्रुव दातार नुकताच बोहोल्यावर चढला आहे. दोन दिवसापासून अभिनेत्याच्या लगीनघाईच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. (Dhruv Datar Wedding)
अभिनेत्याच्या साखरपुड्याच्या फोटोंनीही सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ध्रुवने ‘तू चाल पुढं’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केली. ‘तू चाल पुढं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेत शिल्पीच्या खास मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता ध्रुव दातार विवाहबंधनात अडकला आहे.
खुद्द शिल्पीनेच म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगांवकर हिने ध्रुवच्या लग्नाचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून पोस्ट केला आहे. यांत ध्रुव बोहोल्यावर चढताना पाहायला मिळत आहे. धनश्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवरून अगदी शाही थाटामाटात ध्रुवचा लग्नसोहळा पार पडताना पाहायला मिळत आहे. याशिवाय ध्रुवने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून पत्नीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. लग्न लागण्याआधी त्यांनी हे फोटो काढलेले आहेत. यांत दोघांनी सारख्याच रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केलेले पाहायला मिळत आहेत. यांत दोघांचाही पारंपरिक लूक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेत्याने कोरिओग्राफर असलेल्या अक्षता तिखेला जीवनसाथी मानले आहे. ध्रुव व अक्षता यांचं लग्नसोहळा पार पडल्याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या घरी सुरु असलेल्या लग्नविधींचे फोटो शेअर केले. काल त्याने ग्रहमख व हळदीचे फोटो शेअर केले. शिवाय त्यांच्या संगीत सेरेमनी सोहळ्यातील डान्स व्हिडीओही शेअर केले आहेत.