शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू असा प्रचार करणं चुकीचं”, लाडकी बहिण जाहिरातीचा व्हिडीओ केल्यानंतर अमृता खानविलकर ट्रोल, म्हणाले, “गैरवापर…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 17, 2024 | 12:50 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Amruta Khanvilkar advertised Ladki Bahin Yojana and she is being trolled due to this advertisement

अभिनेत्री अमृता खानविलकरने लाडकी बहीण योजनेची जाहिरात केली असून या जाहिरातीमुळे तिला ट्रोल केले जात आहे.

महायुती सरकारने राज्यामध्ये जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेमध्ये दरमहा १५०० रूपये महिलांच्या खात्यावर जमा होतात. या योजनेची राज्यभर सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमधील तिन्ही पक्षांनी या योजनेची जोरदार मोहीम सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून या योजनेचा दणक्यात प्रचार व प्रसार सुरू आहे. त्यामुळे ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची जाहिरात आता कलाकार मंडळीही करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरने या योजनेची जाहिरात केली असून या योजनेच्या जाहिरातीचा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. (Amruta Khanvilkar Troll)

या व्हिडीओमध्ये अमृताची मैत्रीण अमृतासाठी कैरीचं लोणचं घेऊन येते. अमृताला कैरीचं लोणचं खूप आवडत असल्याने तिलाही आनंद होतो. तेव्हा ती मैत्रीण अमृताला सांगते की, हे लोणचं तिच्या मैत्रिणीने बनवलं असून ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे मिळाल्यानंतर तिने हा व्यवसाय सुरु केला आहे. त्यावर अमृता अशी प्रतिक्रिया देते की, “माझ्या आवडत्या लोणच्यामागे अशी प्रेरणादायी गोष्ट असेल, हे मला माहीतच नव्हतं. खरंच, हे सरकार म्हणजे ना लोकांचं आयुष्य बदलून टाकत आहे बघ…”

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृताने हा जाहिरातीचा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “महिलाओं का है एक ही नारा, महायुती सरकार में योग्य सन्मान हमारा”. तसंच या व्हिडीओच्या शेवटी तिने ‘लाडकी बहीण योजने’मध्ये नाव नोंदवण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान, अमृताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओखाली अमृताने ही जाहिरात केल्याचे पसंत पडले नसल्याचे नेटकऱ्यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा – ऐश्वर्या नारकर यांना मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, खास फोटो केला शेअर, म्हणाल्या, “कृतज्ञ…”

या व्हिडीओखाली एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती”. तर आणखी एकाने “विश्वास बसत नाही तुमच्यासारखी अभिनेत्री यात पडत आहे! हे फुकटचे पैसे आपले आहेत, त्यांच्या खिशातले नाहीत आणि याचा तू प्रचार करत आहेस हे चूक आहे”. अशी कमेंट केली आहे. तसंच एकाने “चंद्रमुखी’नंतरचा तुझा हा दमदार परफॉर्मन्स आहे” अशी मिश्किल कमेंटही केली आहे.

आणखी वाचा – Video : रजनीकांत यांच्या घरामध्ये पुराचं पाणी, चेन्नईमध्ये महागड्या परिसरात राहतात तरीही अशी अवस्था अन्…; व्हिडीओ व्हायरल

यापुढे एकाने “मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, तुम्ही जबाबदारीने वागू शकता आणि तुमच्या प्रभावाच्या क्षमतेचा गैरवापर करु नका” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “निदान कमेंट बघून तरी पुन्हा अशा जाहिराती करणार नाहीस अशी अपेक्षा आहे. काम चांगलं करतेस, तर स्त्रियांना प्रोत्साहन दे की, तुझ्यासारखं संघर्ष करुन पुढे आलं पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे. कसं कमावलं पाहिजे”.

Tags: amruta khanvilkarAmruta Khanvilkar Ladki Bahin Yojana AdvertisementAmruta Khanvilkar Trollmarathi actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Rakul Preet Singh Injured

जिममध्ये बेल्ट न लावताच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने उचललं ८० किलो वजन, जीवावर बेतला स्टंट, अशी अवस्था झाली की…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.