Rakul Preet Singh Injured : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह बाबत खूप मोठी अपडेट आली आहे. अभिनेत्रीच्या आरोग्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. कारण तब्येतीची काळजी घेणंच अभिनेत्रीला महागात पडलं आहे. कलाकार म्हटलं की ते फिट राहण्यासाठी व्यायाम, डाएट करातात. अशातच रकुल व्यायाम करताना गंभीर जखमी झाली असल्याचं समोर आलं आहे. वर्कआउट सत्रादरम्यान ८० किलो डेडलिफ्ट केल्यामुळे त्याच्या पाठीला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या एक आठवड्यापासून ती बेड रेस्टवर असून तिच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा सर्व प्रकार ५ ऑक्टोबरला सकाळी घडला. रकुल प्रीत व्यायाम करत होती. यावेळी तिने बेल्ट न लावता ८० किलो वजनाची डेडलिफ्ट केली. वेदना असूनही तिने व्यायाम सुरुच ठेवला, त्यामुळे तिच्या पाठीला दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. रकुल अजय देवगणबरोबर ‘दे दे प्यार दे २’ मध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या जोरदार सुरु आहे. गंभीर दुखापतीनंतर उपचार घेत औषध घेतल्यानंतर अभिनेत्रीने शूटिंग सुरु ठेवले.
तीन दिवस वेदना सहन केल्यानंतर ती फिजिओथेरपिस्टकडे गेली. दर तीन-चार तासांनी वेदना होत होत्या, पण वाढदिवसाच्या पार्टीच्या एक तास आधी तिची प्रकृती बिघडली. दुखापतीमुळे रकुलच्या L4, L5 आणि S1 नसा ब्लॉक झाल्या आहेत. तिला औषधासह इंजेक्शन देण्यात आले. मात्र, आता ती हळूहळू बरी होत असल्याचं समोर आलं आहे. रकुलच्या तब्येतीने तिच्या चाहतेमंडळींमध्ये काळजीच वातावरण पसरलं आहे.
आणखी वाचा – ‘Bigg Boss 18’च्या घरात विवियन डिसेनाचं खासगी आयुष्यावर सतत भाष्य, घटस्फोटाबाबत म्हणाला, “मला तिने सहन…”
२००९ मध्ये ‘गिल्ली’ या कन्नड चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. तर २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला यारिया हा तिचा पहिला हिंदी चित्रपट ठरला. ती ‘आयलान ‘आणि ‘इंडियन 2’ या तमिळ सिनेमांचा एक भाग आहे. पुढच्या वर्षी ती ‘इंडियन 3’ आणि ‘दे दे प्यार दे 2’ या दोन्ही प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटामध्येही दिसणार आहे.