तमिळनाडूची राजधानी चेन्नईसह आसपासच्या जिल्ह्यांना सोमवारी रात्रीपासून पावसाने झोडपले आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सामान्य जनतेसह कलाकारांनादेखील बसत आहे. चेन्नईत सध्या मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. पावसाचे ही पाणी लोकांच्या घरामध्येही जात आहे. अशातच दक्षिण सुपरस्टार रजनीकांत यांनाही या पावसाच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रजनीकांत यांच्या आलिशान घरात पावसाचे पाणी शिरले आहे. तसंच त्यांच्या घराच्या आसपासचा परिसरही पाण्याखाली गेला आहे. (Rajinikanth Home Flooded)
अभिनेते रजनीकांत यांचे घर चेन्नईच्या एका महत्त्वाच्या भागात आहे. या परिसरात अनेक नामवंत व्यक्ती, व्यापारी, वकील राहतात. मात्र तरीही या ठिकाणी मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरी पावसाचे पाणी गेलं आहे. काही मीडिया रिपोर्टसनुसार, स्थानिक महापालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ पाणी उपसण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना सुरु केल्या आहेत. रजनीकांत यांचे कर्मचारीही पाणी निचरा करण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याची खात्री देत आहेत.
#WATCH | Tamil Nadu: Severe waterlogging witnessed in parts of Chennai city after incessant rainfall in the region; visuals from Pattalam area. pic.twitter.com/bMUPUE2jMl
— ANI (@ANI) October 16, 2024
आणखी वाचा – ऐश्वर्या नारकर यांना मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, खास फोटो केला शेअर, म्हणाल्या, “कृतज्ञ…”
तमिळनाडूमध्ये ईशान्य मान्सूनच्या आगमनाने पावसाने जोर धरला आहे. चेन्नईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पुराची समस्या उद्धभवली आहे. या पावसामुळे शाळा व महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, कर्नाटक, केरळ तसेच गोवा आणि बिहारमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आणखी वाचा – Bigg Boss 18 मध्ये होणार मिड वीक एलिमिनेशन, ‘हा’ स्पर्धक जाणार घराबाहेर? सदस्यांनीच घेतला निर्णय
दरम्यान, रजनीकांत यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्यांची भूमिका असलेला ‘वेट्टियांन’ हा अक्शन ड्रामा हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रजनीकांत यांच्यारोबर अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पाच दिवसांत देशभरात १०० कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली आहे.