मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनय व सौंदर्याने ९० चं दशक गाजवलं. त्या काळातील त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांची पन्नाशी ओलांडली असतील तरी त्यांच्यात असलेला उत्साह हा तरुणाईला लाजवणारा आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री आहेत. आपल्या हटके अभिनयानं त्या सगळ्यांचेच मनोरंजन करताना दिसतात. टेलिव्हिजन क्षेत्रातही त्या फार सक्रिय आहेत. त्यांच्या अनेक भुमिका गाजल्या आहेत. ‘या सुखांनो या’ पासून ते ‘स्वामिनी’तील गोपिकाबाई ते आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील खलनायिका. त्यांच्या अभिनयाचे सर्वच जण चाहते आहेत. (Aishwarya Narkar Award)
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या व त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर यांचे रिल्स व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओमुळे त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. पण ऐश्वर्या ट्रोलर्सना न जुमानता अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. ऐश्वर्या या सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. या मालिकेत त्यांच्याबरोबर अभिनेत्री तितिक्षा तावडे, एकता डांगर, श्वेता मेहेंदळे अशा अभिनेत्री आहेत. त्यामुळे या अनेकदा त्यांचे फोटो व व्हिडीओ शेयर करत असतात.
आणखी वाचा – लोकप्रिय ‘सीआयडी’ मालिका आता मराठीमध्ये येणार, नवीन प्रोमो समोर, उत्सुकता शिगेला
अशातच अभिनेत्री तितीक्षा तावडेने ऐश्वर्या यांचा फोटो शेअर केला आहे. ऐश्वर्या यांना नुकताच एक अवॉर्ड मिळाला असून या निमित्ताने तितीक्षाने ऐश्वर्या यांचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे. ऐश्वर्या यांना नुकताच ‘आंतरराष्ट्रीय आयकॉनिक अवॉर्ड्स २०२४’ (International Iconic Awards 2024) हा पुरस्कार मिळाला असून या पुरस्कारानिमित्त कौतुक करण्यासाठी तितीक्षाने खास पोस्ट शेअर केली आहे. “अभिनंदन ऐश्वर्या ताई” असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. ऐश्वर्या यांनीदेखील त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्रॉफीबरोबरचा फोटो शेअर करत “कृतज्ञ” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss 18 मध्ये होणार मिड वीक एलिमिनेशन, ‘हा’ स्पर्धक जाणार घराबाहेर? सदस्यांनीच घेतला निर्णय
दरम्यान, . सध्या ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आजवर ऐश्वर्या यांनी अनेक मालिका, चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.