बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, राज्य सरकारने अभिनेत्याची सुरक्षा वाढवली, धमक्या येण्यामागचं नेमकं कारण काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 9, 2023 | 2:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shahrukh khan in y + security

shahrukh khan in y + security

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा अलिकडे आलेला ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर बराच गाजला. या चित्रपटाने जगभरात बरीच धुमाकुळ घातली होती. शाहरुखच्या या यशानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. शाहरुखच्या या वर्षी आलेल्या ‘पठाण’ व ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरंच यश मिळवलं. पण या चित्रपटाच्या यशानंतर शाहरुखला जीवे मारण्याच्या धमकीचे फोन यायला लागले होते. याबाबत त्याने राज्य सरकारकडे लेखी तक्रारही केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी शाहरुखची सुरक्षा वाढवली असून ती  Y+ एवढी करण्यात आली आहे. (shahrukh khan in y + security)

राज्य सरकारच्य निर्देशानुसार आयजी व्हीआयपी सिक्युरिटीने शाहरुखच्या सुरक्षेत वाढ केली आहे.  तैनात सुरक्षा सेवेला खाजगीरित्या निधी दिला जाणारा आहे. हा संबंधीत खर्च शाहरुख स्वतः करणार आहे. ही रक्कम तो राज्य सरकरला देणार देणार आहे. Y+ सुरक्षा ही उच्च धोका असलेल्या व्यक्तींनाच दिली जाते. यात धोका असलेल्या व्यक्तीच्या निवासस्थानी पाच सशस्त्र रक्षकांसह वैयक्तिक सुरक्षा अधिकारी तीन शिफ्टमध्ये चोवीस तास तैनात केले जातात. शाहरुखला आलेली धमकी लॉरेन्स बिश्नोईकडून आली असल्याचं म्हटलं जात असल्यामुळे त्याला ही अधिक Y+ सुरक्षा देण्यात आली आहे.

The Maharashtra government increases the security of Actor Shah Rukh Khan to Y+ after he allegedly received death threats. Shahrukh Khan had given a written complaint to the state government that he had been receiving death threat calls after the films 'Pathan' and 'Jawan'.:…

— ANI (@ANI) October 9, 2023

आणखी वाचा – “मराठीची अवस्था बिकट…”, ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहायला थिएटरमध्ये फक्त पाच प्रेक्षक, मनसेचे अमेय खोपकर यांचा संताप, म्हणाले, “प्रेक्षक मिळत नसतील तर…”

शाहरुखच्या हायऑक्टेन थ्रिलर ‘जवान’ चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ११०३.२७ कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट ७ सप्टेंबरला हिंदी, तामिळ तसेच तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. जागतिक स्तरावर या चित्रपटाने ११०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून एवढा मोठ टप्पा ओलांडणारा तो पहिलाच हिंदी चित्रपट ठरला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

आणखी वाचा – “ते बघून मला रडू आलं”, ३६ दिवस अमेरिकेत राहिल्यानंतर भारतात परतणार संकर्षण कऱ्हाडे; म्हणाला, “तिथे असणारी मराठी माणसं…”

हा चित्रपट सामाजिक चुका सुधारण्याचा निर्धार करणाऱ्या माणसाचा प्रवास दाखवला गेला आहे. या चित्रपटात शाहरुखने विक्रम राठौर व त्याचा मुलगा आझाद या दुहेरी भूमिकेत दिसला आहे. तसेच या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती हे सहकलाकाराच्या भूमिकेत आहेत. तर दीपिका पादुकोण व संजय दत्त विशेष भूमिकेत आहेत.

Tags: death threatsin y + securityjawan and pathan success
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Dattu more dandiya dance and onkar raut garaba dance video

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर दत्तू मोरेचा दांडिया डान्स, तर ओंकार राऊतचा गरबा पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.