जेव्हा एखादा कलाकार विविध माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतो. तेव्हा साहजिकच त्या कलाकाराला त्यांचे प्रेम व प्रतिसाद महत्वाचे असते. अनेक प्रेक्षक कलाकारांचे, त्याने साकारलेल्या भूमिकांचे भरूभरून कौतुक करतात. त्यासाठी ते विविध माध्यमातून कलाकारांप्रति आपल्या भावना व्यक्त करतात. मात्र जेव्हा प्रेक्षकांना आपल्या भावना त्यांच्या आवडत्या कलाकारासमोर व्यक्त करता येत नाही, तेव्हा ते पत्राचा वापर करतात. सध्या टेक्नोलॉजी आणि सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे अनेक जण आपल्या भावना सोशल मीडियाद्वारे व्यक्त होतात. पण काहीजण असेही आहेत, जे अजूनही आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पत्रांचा वापर करतात.
रंगभूमीतील प्रत्येक कलावंत हा सर्वगुण संपन्न अभिनयाने व विविध कलांनी भरलेला असतो. असाच एक अभिनेता जो आपल्या सर्वगुण संपन्न अभिनयासाठी ओळखला जातो, तो म्हणजे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे. प्रायोगिक नाटकांपासून रंगभूमीची सेवा करणाऱ्या संकर्षणच्या अंगी विविध कला आहे. त्यामुळेच चाहते त्याच्या या अतरंगी कलेचे भरभरून कौतुक करतात.
संकर्षणचे सध्या ‘नियम व अटी लागू’ आणि ‘तू म्हणशील तसं’ ही दोन नाटके रंगभूमीवर सुरु असून ज्यात त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. नाटकांच्या प्रयोगादरम्यान संकर्षणचे अनेक ठिकाणी दौरे होतात, त्यात त्याला अनेक प्रेक्षक भेटतात. मात्र वेळेअभावी काही चाहत्यांना संकर्षणशी बोलायला मिळत नसल्यामुळे प्रेक्षक आपापली पत्रे त्याला देतात. संकर्षणाकडे या पत्रांचा खजिना असून या पत्रांनी संकर्षण प्रचंड भारावून गेला आहे. (sankarshan karhade shared a post)
काय म्हणाला संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade thanks to fans)
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने यातील काही पत्रांचा एक छानसा कोलाज बनवत एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोसोबत त्याने एक पोस्ट लिहिली असून ज्यात त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये संकर्षण म्हणतो, ‘”प्रेक्षकांचा प्रत्येक शब्दं मोलाचा….” ????????❤️ गेल्या काही महिन्यांत प्रेक्षकांनी प्रयोगाला येऊन मला अशी अनेक पत्रं दिली. काही पत्रांमध्ये प्रचंड प्रेम होतं, कौतुक होतं, काहींमध्ये सूचना, भेटवस्तू, आणि काहींमध्ये काळजी.. प्रेक्षकांचा हा प्रत्येक शब्द माझ्यासाठी मोलाचा आहे म्हणून मी ही सगळी पत्रं आज लॅमिनेट करुन आणलीयेत आणि त्याची फाईल तयार केली. आता ह्या सगळ्या पत्रांना मी माझ्या स्वतःच्या अक्षरांत पत्रं लिहूनच उत्तर देणार.. (माझं अक्षर नाहीच कळणार तरीही..???????? करा आता सहन) पण, मोलाची गोष्टं ही कि सेल्फीच्या जमान्यात हा पत्रं प्रपंच माझ्यात आणि प्रेक्षकांमध्ये होणार ❤️ भेटूच…”
हे देखील वाचा – पडद्यामागील कलाकारांसाठी अशोक सराफ यांनी उचललं हे पाऊल, भावना व्यक्त करत म्हणाले, “ज्या कलाकारांनी मला मदत केली…”
हे देखील वाचा – रसिका सुनीलने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून व्हाल थक्क
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने अनेक नाटक व मालिकांमध्ये काम केलेलं असून या दोन नाटकांबरोबर तो छोट्या पडद्यावरही सक्रिय आहे. (actor sankarshan karhade)