शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पडद्यामागील कलाकारांसाठी अशोक सराफ यांनी उचललं हे पाऊल, भावना व्यक्त करत म्हणाले, “ज्या कलाकारांनी मला मदत केली…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
जुलै 31, 2023 | 12:21 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
ashok saraf helps 20 backstage artist

ashok saraf helps 20 backstage artist

पडद्यावरील भूमिका हा प्रत्येक कलावंताचा अविभाज्य घटक आहे, मग ती रंगभूमी असो, की मोठा पडदा. कलावंत त्याच्या अभिनयातून रंगभूमीवर सक्षमपणे वावरतो, त्यामागची संपूर्ण मेहनत ही पडद्यामागील सहकाऱ्यांची असते. त्यांना फारसं कुणी ओळखत नसलं, मात्र कलावंतासाठी ही एक महत्वाची व्यक्ती असते. अश्याच पडद्यामागील कलावंतांसाठी मराठी मनोरंजन सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी स्तुत्य उपक्रम राबवला आहे. (ashok saraf)

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी गेल्या वर्षी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली होती. त्यानिमित्त अशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांच्या विविध नाटकांना लाभलेले प्रायोजक, रंगमंच तंत्रज्ञ, गायक-संगीतकार, सहकलाकार व पडद्यामागील अन्य मंडळींचा त्यांच्या रंगभूमीतील योगदानाबद्दल सन्मान व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. ती इच्छा अखेर अशोक सराफ यांनी पूर्ण केली. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी ह्या कलावंतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दादर येथे शनिवारी “कृतज्ञ मी… कृतार्थ मी” या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी अशोक सराफ यांच्या हस्ते पडद्यामागील २० कलावंताचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करत प्रत्येकी ७५ हजारांची मदत करण्यात आली. ज्यात नाट्यनिर्माते, सह कलावंत, नेपथ्यकार, लेखक व अन्य पडद्यामागील मंडळींचा समवेश आहे. (ashok saraf helps backstage artist)

काय म्हणाले अशोक सराफ ? (ashok saraf helps backstage artist)

या उपक्रमामागची संकल्पना सांगताना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले, “खरंतर यामागची पहिली संकल्पना निवेदिताची होती. तिने मला एकेदिवशी सहज म्हणाले, की आपण आपल्याला मिळालेले सर्व पैसे येतील ते आपण या कलावंतांना मदत म्हणून देऊया. हे ऐकून मी पहिल्यांदा घाबरलो. कारण, हे म्हणणं सोप्पं असता पण करणं फार कठीण असतं. शिवाय माझा सक्खा मावस भाऊ जो गोव्यातील उद्योजक आहे, डॉ. पैठणकर तेही माझ्या मागे लागले. पण हे करतोय, तर कसं करायचं. शेवटी ही सगळी धुरा लहान भाऊ सुभाष, पत्नी निवेदिता सराफ आणि ग्रंथाली प्रकाशन यांनी सांभाळली होती.”

“शिवाय या लोकांचे आभार मानताना माझ्या या संपूर्ण करिअरमध्ये त्या कलाकारांनी माझी मदत केली, त्यांच्या भावी जीवनासाठी माझ्याकडून काहीतरी हातभार लागेल. आणि त्यांना जर ह्या मदतीतून तर आनंद मिळत असेल, तर मला यातून कृतार्थ झाल्यासारखे वाटेल.”, असे अशोक सराफ यावेळी म्हणाले.

अशोक सराफ यांनी आपल्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत अनेक सिनेमे, मालिका व नाटक केली आहे. सध्या त्यांनी पंच्याहत्तरी पूर्ण केली असली, तरी त्यांची रंगभूमीशी नाळ अजूनही कायम आहे. सध्या अशोक मामाचं ‘व्हॅक्यूम क्लिनर’ नाटक रंगभूमीवर सुरू असून रंगभूमीवरील पडद्यामागील कलावंतांसाठी त्यांनी उचललेलं पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. (ashok saraf helps backstage artist)

हे देखील वाचा : सई ताम्हणकरने इंस्टग्राम लाईव्ह येत घडवली ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’तील कलाकारांची भेट

Tags: ashok sarafbackstage artistmarathi natak
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
gashmeer mahajani replys to fan on ask me section

महाराजांची भूमिका साकारण्यावरून गश्मीर महाजनी स्पष्टच बोलला, चाहत्याला उत्तर देत म्हणाला, "थांबा जरा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.