रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लग्नानंतर आयुष्य बदलले आहे का?”, चाहत्याच्या प्रश्नावर प्रथमेश परबच्या बायकोचे थेट उत्तर, म्हणाली, “माझ्या नवऱ्याच्या…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 20, 2024 | 12:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prathamesh Parab's wife Kshitija Ghosalkar answered to fan's question.

“लग्नानंतर आयुष्य बदलले आहे का?”, चाहत्याच्या प्रश्नावर प्रथमेश परबच्या बायकोचे थेट उत्तर, म्हणाली, “माझ्या नवऱ्याच्या...”

‘टाईमपास’ या लोकप्रिय चित्रपटातून पराजूवर प्रेम करणारा आणि खऱ्या प्रेमाची किंमत समजावून सांगणारा दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकला. प्रथमेशने गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या आधी अनेक दिवसांपासून प्रथमेश-क्षितिजा यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती आणि शेवटी हे दोघे एकमेकांबरोबर विवाहबंधनात अडकले आहेत. जवळचे नातेवाईक, कुटुंबिय व मित्रपरिवाराच्या खास उपस्थितीत प्रथमेश-क्षितिजा यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे.

प्रथमेश व क्षितिजा हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांच्या कामाव्यतिरिक्त आपल्या कामाची माहितीही देत असतात. त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांनाही अधिक रस असतो. त्यामुळे ते दोघे शेअर करत असलेल्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. अशातच क्षितिजाने तिच्य इन्स्टाग्रामद्वारे प्रश्नोत्तरांचा खास सेगमेन्ट केला होता. यामध्ये तिला नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले. यापैकी एका प्रश्नाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

आणखी वाचा – सकाळी उठताच दारुने गुळण्या, सतत ड्रग्जमुळे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची झाली होती भयानक परिस्थिती, आता कसं जगत आहे आयुष्य?

एक नेटकऱ्याने क्षितिजाला “कामाचे आयुष्य तुझ्यासाठी कसे आहे? सोपे की कठीण?, लग्नानंतर तुझे आयुष्य बदलले आहे का?” असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर देत क्षितिजाने असं म्हटलं आहे की, “माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या नवीन कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे व त्याच्या सोबतीमुळे आमचे लग्नानंतरचे आयुष्य अधिक सोपे आणि परिपूर्ण झाले आहे. आम्ही दोघांनी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्यामुळे तसेच आमचे यश एकत्र साजरे केल्याने आमचे वैयक्तिक आयुष्यातील व व्यावसायिक आयुष्यातील दोन्ही पैलू बदलले आहेत. ज्यामुळे आम्ही आनंदी जीवन जगू शकत आहोत”

आणखी वाचा – रविवारी कर्क व मकर राशीसह ‘या’ पाच राशींना आर्थिक लभाचे योग, तर ‘या’ राशींवर असणार सूर्यादेवाची विशेष कृपा

दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश व क्षितिजा यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. अगदी थाटामाटात व पारंपरिक अंदाजात दोघांनी लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. प्रथमेश व क्षितिजा यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. 

Tags: kshitija ghosalkarmarathi actormarathi entertainment newsprathamesh parab
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Tharla tar mag Marathi serial upadate Sayali expresses her love for Arjun to Kusumtai new promo

कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपतानाच सायली-अर्जुन एकमेकांच्या प्रेमात, सायलीने अर्जुनविषयीची प्रेमभावना केली व्यक्त, नवीन प्रोमोने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.