शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“फक्त त्या चार मुलींनाच…” चित्रपटात मुख्य भूमिका न मिळण्यावरुन नोरा फतेहीचा संताप, म्हणाली, “मला फक्त…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 5, 2023 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nora Fatehi anger over not getting the lead role in the film

Nora Fatehi : "फक्त त्या चार मुलींनाच…" चित्रपटात मुख्य भूमिका न मिळण्यावरून नोरा फतेहीचा संताप, केली निर्मात्यांवर टीका

बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही आपल्या अप्रतिम डान्स मूव्हज आणि सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेते. यासोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून तिची फॅन फॉलोविंग प्रचंड आहे. २०२० मध्ये ‘स्ट्रीट डान्सर 3D’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी नोरा फतेही तिच्या डान्स नंबरसाठी जास्त ओळखली जाते. नोराने अनेक गाण्यांमध्ये आपल्या डान्सची झलक दाखवली आहे, त्याचे अनेकदा कौतुक होते. (Nora Fatehi)

असं असूनही नोरा कुठल्याही चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली नाही. तसा उल्लेख करताना नोराने आपल्याला बॉलीवूड चित्रपटात मुख्य भूमिका देण्यावरून निर्माते टाळाटाळ करत असल्याचा केला आहे. त्याचसोबत नोराने केवळ त्या चार मुलींनाच मुख्य भूमिका देत असल्याचा आरोप चित्रपट निर्मात्यांवर केला आहे. एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नोराने नाव न घेता तिला चित्रपटात मुख्य भूमिका मिळत नसल्याबाबत संताप व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा – Actress Suffer From Health Issue: कर्करोगावर मात केल्यानंतर आणखी एका आजाराचा सामना करतेय ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “श्वास घेण्यासाठीही…”

नोरा फतेही मुलाखतीत म्हणाली की, “बॉलीवूडमध्ये आजच्या काळात स्पर्धा वाढली आहे. वर्षभरात मोजकेच चित्रपट आले आहेत. पण चित्रपट निर्माते त्यांच्या स्वतःच्या कल्पनेपलीकडे त्यांच्या समोर काय आहे, हे कधी पाहतच नाहीत. ते केवळ चार जणींना घेऊन चित्रपट करत आहेत. त्यांनाच सतत प्रोजेक्ट मिळतात. चित्रपट निर्मात्यांनाही तेच तेच लोक सतत आठवतात. चार अभिनेत्रींव्यतिरिक्त पाचव्या अभिनेत्रीला काम करण्याची संधी दिली पाहिजे. मला फक्त स्वतःला सिद्ध करायचे आहे जेणेकरून मी जगू शकेन, हे पुढचे आव्हान आहे.” (Nora Fatehi anger over not getting the lead role in the film)

हे देखील वाचा – तब्बल २० वर्षांनी चित्रपटगृहांत पुन्हा प्रदर्शित होणार ‘कोई मिल गया’, कुठे व कधी पाहता येणार चित्रपट?

नोरा आतापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपट आणि म्युझिक अल्बममध्ये दिसली असून तिचे सर्वच डान्स नंबर्स गाजलेले आहेत.

Tags: bollywood newsnora fatehi
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Genelia D'Souza Birthday

Genelia D'Souza Birthday : …अन् त्यानंतर देशमुखांच्या सूनेचं नशीब बदललं, जिनिलीयाने सांगितलेला 'तो' किस्सा, म्हणालेली, "४०० मुलींचं ऑडिशन आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.