रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दीपिका पदुकोणला मुलगा होणार की मुलगी?, रणवीर सिंहने केलेलं भाष्य चर्चेत, म्हणालेला, “माझं कुटुंब…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 29, 2024 | 4:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ranveer singh on Baby

दीपिका पदुकोणला मुलगा होणार की मुलगी?, रणवीर सिंहने केलेलं भाष्य चर्चेत, म्हणालेला, "माझं कुटुंब..."

 अभिनेत्री दीपिका पदुकोण व अभिनेता रणवीर सिंह यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये बाळ जन्माला येणार अशी पोस्ट खुद्द दीपिकाने केली आहे.  दोघांच्या लग्नाला ६ वर्ष झाली असून आता दीपिकाने आई होण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८ मध्ये रणवीर व दीपिका लग्नबंधनात अडकले होते. काही दिवसांपूर्वीच दीपिकाने ‘बाफ्टा’ पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. तेव्हा दीपिकाच्या साडी नेसण्याच्या पद्धतीने ती गरोदर असल्याची चर्चा रंगली होती. पण आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. (Ranveer singh on Baby)

दीपिका-रणवीरच्या घरी बाळ येण्याची घोषणा करताच सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच रणवीरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने बाळाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजीव मसंद यांच्याबरोबर झालेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला होता की, “जर मी  अभिनेता नसतो तर मी नक्की कोण असतो हे मला माहीत नाही. पण माझी खूप सारी मुलं असती हे मात्र नक्की. माझ्या कुटुंबाशिवाय मी अपूर्ण आहे. मला मुलं खूप आवडतात. मी सतत मुलांच्या फोटोकडे बघत असतो आणि त्यांच्याबद्दल विचारही करतो”.

आणखी वाचा – Video : हनिमूनबाबत विचारताच प्रसिद्ध अभिनेत्यावर भडकली गायिका, चालू शोमध्ये कानाखाली मारु लागली अन्…; संपूर्ण प्रकरण कॅमेऱ्यात कैद

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

पुढे तो म्हणाला होता की, “दीपिका स्वतः लहान असताना फार गोंडस होती. मी तिचे फोटो रोज बघतो आणि मला पण असंच एक बाळ हवं आहे असं म्हणतो ”, असं त्याने सांगितलं. तसेच रणवीरला त्याचे एक सुंदर घर असावे, त्यामध्ये त्याची पत्नी,मुलं आणि त्याचे संपूर्ण कुटुंबं सुखी व आनंदी असावे असे वाटते. त्यानंतर त्याला विचारण्यात आले की, “तुला मुलगा हवा की मुलगी?”,त्यावर तो म्हणाला की, “मला मुलगी हवी असं वाटतं. कारण मुली खूप गोड, गुणी, हुशार आणि सर्वांना आपलंस करणाऱ्या असतात”, असं त्याने सांगितलं.

आणखी वाचा – अनंत अंबानीच्या होणाऱ्या सासऱ्याची आहे इतकी संपत्ती, स्वतः करतात हे काम, एकूण कमाई आहे…

नुकत्याच ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये पहिल्यांदाच दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ दाखवण्यात आला होता. यामध्ये रणवीर व दीपिकाच्या लग्नाची बोलणी कशी झाली?, आई-वडिलांना कसे मनवले? तसेच दीपिकाला लग्नासाठी कशी मागणी घातली? याचा खुलासा करण्यात आला आहे.

Tags: babybaby bornbaby comingbollywoodbollywood actordeepika padukoneranveer singh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Prathamesh Parab and Kshitija Ghosalkar went on vacation after their wedding

लग्नानंतर बायकोसह पुण्यातील 'या' ठिकाणी फिरायला गेला प्रथमेश परब, फोटोही केला शेअर, म्हणाला, "थोडासा वेळ काढून..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.