सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका चालू कार्यक्रमात एक महिला एका पुरुषाने गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्या अंगावर धावून जाते व त्याला कानाखाली मारते. पाकिस्तानची प्रसिद्ध गायिका शाझिया मंजूर हिने कॉमेडियन शेरी नन्हाला एका लाईव्ह शोमध्ये कानाखाली मारल्याचा हा व्हिडिओ आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये गायिका शाझिया मंझूर शेरी नन्हा यांच्यावर खूप चिडते आणि त्यांना कानाखाली मारताना दिसत आहे. शाझिया मंजूर यांच्याशी त्यांच्या हनिमूनबद्दल बोलत असताना कॉमेडियनवर गायिका संतापते. गायिकेला तिचा राग अनावर होतो आणि त्यानंतर ती चालू कार्यक्रमातच त्याच्यावर धावून जात त्याला कानाखाली मारत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
Slap kalesh b/w Pakistani Singer Shazia Manjoor and Co-Host of show over making joke on 'Honeymoon' with a Woman
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 27, 2024
pic.twitter.com/6fehVrq7NS
एक चालू कार्यक्रमात शेरी नन्हा शाझिया मंजूरला असं म्हणतात की, “आपण जर लग्न केले तर मी तुम्हाला हनीमूनसाठी मॉन्टे कार्लोला घेऊन जाईन. तुम्हाला यायला आवडेल का?” हे ऐकताच शाझिया मंझूरचा संयम तुटतो. गायिका रागाने तिच्या जागेवरून उठते आणि शेरी नन्हाकडे जाते आणि त्याला “एक गोष्ट आहे की, तू खूपच थर्ड क्लास माणूस आहेस” असं म्हणत कानाखाली मारते.
दोघांच्या या भांडणात त्यांना शांत करण्यासाठी शोचा होस्ट मोहसीन अब्बास हैदरही मध्ये पडतो. मात्र, शाझिया मंजूर त्याला थांबवत असं म्हणतात की, “आज कोणीही पुढे येऊ नये. हनिमूनबद्दल एका बाईबरोबर मस्करी करणे तुला आवडते का? तू दरवेळेसच अशी मस्करी करतो. पण आता मी तुला ओरडले हे अगदी योग्य केले आहे.”
हे सर्व ऐकल्यानंतर त्यांच्यात मध्यस्थी करणारा होस्ट मोहसीन अब्बास हैदरही शेरी नन्हा यांच्यावर नाराजी व्यक्त करतो आणि म्हणतो, “शेरी, तू उगाच काहीही बोलू नकोस. स्क्रिप्टमध्ये जे लिहिले आहे ते बोल.” दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीहे या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.