“आईबाबा आणि साईबाबाची शपथ अशीच पाहिजे आपल्याला” असं म्हणत पराजूवर प्रेम करणारा आणि खऱ्या प्रेमाची किंमत समजावून सांगणारा दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. प्रथमेशने नुकतीच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरबरोबर लग्नगाठ बांधली. गेले काही दिवस प्रथमेश-क्षितिजा यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती आणि शेवटी हे दोघे एकमेकांबरोबर विवाहबंधनात अडकले आहेत. जवळचे नातेवाईक, कुटुंबिय व मित्रपरिवाराच्या खास उपस्थितीत प्रथमेश-क्षितिजा यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे.
प्रथमेश-क्षितिजा यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला होता. अशातच आता दोघांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे त्यांचे काही आणखी फोटो शेअर केले आहेत. प्रथमेश व क्षितिजा त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदाच फिरायला गेले आहेत. दोघेही लोणावळाला फिरायला गेले असून प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे लोणावळामधील एक खास फोटो शेअर केला आहे.
प्रथमेशने लोणावळामधील हा फोटो शेअर करत त्यावर असं लिहिलं आहे की, “दोघांच्याही व्यस्त वेळापत्रकामुळे २-३ महिन्यांनी कुठेतरी फिरायला जायचं ठरलं आहे. पण त्याआधी आवर्जून वेळ काढून एका ठिकाणाला भेट द्यावीशी वाटली. जिथे असंख्य लॉन्ग ड्राईव्ह, अविस्मरणीय सूर्यास्त, वाढदिवसांचे सेलिब्रेशन्स, कांदाभजी, मिसळ आणि न संपणाऱ्या गप्पा आहेत. या ठिकाणी एक आणि अधिक आठवणी आहेत आणि त्याच आठवणींना आज भेटायला आलो आहे”.
दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ते राहत असलेल्या बंगल्याचा खास फोटोदेखील शेअर केला आहे. “पुढील २ दिवसांसाठी हे आमचं घर आहे” असं म्हणत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, प्रथमेश-क्षितिजा लग्नानंतर त्यांच्या व्यस्ततेमधून वेळ काढत महाबळेश्वर इथे फिरायला गेले असून दोघेही एकमेकांबरोबर लग्नानंतरचे काही खास क्षण एन्जॉय करत आहेत.