बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनंत अंबानीच्या होणाऱ्या सासऱ्याची आहे इतकी संपत्ती, स्वतः करतात हे काम, एकूण कमाई आहे…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 29, 2024 | 2:56 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Radhika Marchant father net worth

अनंत अंबानीच्या होणाऱ्या सासऱ्याची आहे इतकी संपत्ती, स्वतः करतात हे काम, एकूण कमाई आहे...

 भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी पुन्हा एकदा लग्नाची लगबग सुरू आहे. अंबानी कुटुंबातील लहान मुलगा अनंत अंबानी त्याची बालमैत्रिण राधिका मर्चंटबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. दोघेही १२ जुलै रोजी लग्न करणार असून १ मार्च ते ३ मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगर येथे लग्नापूर्वीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमासाठी बॉलिवूड,हॉलिवूड तसेच इतर सर्वच क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. नुकतेच सोशल मीडियावर ‘अन्न सेवा’ कार्यक्रमामधील  राधिका व अनंत यांची झलक पाहायला मिळाली. (Radhika Marchant father net worth)

जगातील श्रीमंत उद्योगपतींमध्ये मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते. याआधी त्यांचा मुलगा आकाशने श्लोका मेहता व मुलगी ईशाने आनंद पिरामलबरोबर विवाह केला. दोघांचाही विवाहसोहळा दिमाखात पार पडला होता. आता अनंत व राधिका यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. अनंत व राधिका हे बालपणीचे मित्र आहेत. दोघांचेही मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण राधिका मर्चंट नक्की कोण आहे? काय करते? तिची संपत्ती किती? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तर आता याबद्दल जाणून घेऊया.

आणखी वाचा – “काही दु:ख सांगता येत नाहीत”, निवेदिता सराफ यांची हृदयाला स्पर्श करणारी कविता, म्हणाल्या, “बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…”

View this post on Instagram

A post shared by Radhika Merchant ✨ (@radhika.merchant_)

राधिका मर्चंट ही भारतीय उद्योगपती विरेन मर्चंट यांची मुलगी आहे. विरेन मर्चंट हे ‘एंकोर’ या हेल्थकेअर कंपनीचे सीईओ आहेत. याव्यतिरिक्त भारतीय बाजारपेठेतील अनेक कंपन्याही ते सांभाळत  आहेत. यामध्ये ‘एंकोर बिजनेस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड’, ‘एंकोर नॅच्युरल पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘जेडवाईज फार्मा प्रायव्हेट लिमिटेड’, ‘सैदर्शन बिजनेस सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेड’ व ‘एंकोर पॉलिफ्रॅक प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’,या कंपन्यांचा समावेश आहे. ‘डीएनए’च्या रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती ७५५ कोटी रूपये इतकी आहे.   

आणखी वाचा – लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका पदुकोणने घेतला आई होण्याचा निर्णय, मराठी कलाकारांकडून कौतुक, रणवीर सिंगचाही केला उल्लेख, म्हणाले…

राधिकाबद्दल सांगायचे झाले तर तिच्या संपत्तीचा आकडा समजू शकलेला नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार तिची एकूण संपत्ती ८ ते १० कोटी असण्याचा अंदाज आहे. राधिकाला नृत्याची आवड असून काही दिवसांपूर्वीच तिचा ‘भरतनाट्यम्’ चा ‘अरंगेत्रम’ कार्यक्रम पार पडला. त्याचबरोबर अंबानी कुटुंबाची  एकूण संपत्ती ही ३,४४,००० कोटी रुपये असल्याचे रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

Tags: ambani familyanant ambaniradhika marchantveren marchant propertyviren marchant
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Narathi News

हटके ड्रेसिंग स्टाइल, महागडे दागिने अन्…; पूजा सावंतच्या लग्नात मराठी कलाकारांचीच अधिक हवा, कुटुंबियांना घेऊन आले आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.