राखी सावंतला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिचं नाव अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतच. तिने मागच्या वर्षी आदिल दुर्राणीसह दुसरं लग्न केलं होतं. यानंतर राखीने हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्विकारला होता. ती नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतच असते. आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आदिलसोबतच्या वादादरम्यान ती मक्क-मदीनाला गेली होती. तिथून परतल्यानंतर तिने केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात तिने हिंदू धर्मावर उघडपणे बोलताना दिसली. तिने केलेल्या वक्ताव्यामुळे नेटकरी तिच्यावर बरेच संतापले आहेत.(rakhi spoke about hindu religion)
राखीने लग्नानंतर पतीसाठी हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचं सांगितलं होतं. पण आदिल व राखीच्या लग्नानंतर त्यांच्या नात्यात अनेक नाट्यमय वळणं आली. त्यामुळे या दोघांमधील वाद नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. नुकतीच ती मक्का-मदीनावरून आल्यानंतर तिने हिंदू धर्मावर वक्तव्य केलं.
वाचा – हिंदू धर्माबद्दल काय बोलली राखी?(rakhi spoke about hindu religion)
एका पत्रकारानं राखीला इस्लाम धर्म स्वीकारण्यावरून प्रश्न केला. ‘तू इस्लाम धर्म स्वीकारला, हिंदू धर्मात काय खराबी आहे?’. यावर राखीने उत्तर दिलं की,‘हिंदू धर्मात काहीही खराबी नाही. मी मुस्लीम धर्मात निकाह केला होता आणि गेल्या एका वर्षापासून मी आदिलबरोबर निकाहात आहे. जेव्हा मी निकाह करत, इस्लाम धर्म स्वीकारला, तेव्हा हे सगळं करावच लागतं. मी बरीच नशीबवान आहे की, मला मक्का व मदिना येथून बोलवणं आलं’.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला खडसावलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली की, ‘ही हिंदू कधीच नव्हती. ही आधीपासूनच ख्रिश्चन होती’. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं की, ‘निकाह केला म्हणून मुस्लीम झाली, आता तलाक झाला तर ख्रिश्चन बनेल.. तू हिंदू नाहीस..’. नवऱ्याबरोबर संबंध बिघडलेले असताना आणि हा विषय घटस्फोटापर्यंत येवून पोहोचलं असताना तिचं हे असं यात्रेला जाणं हे नाटकीच होतं.