चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींना मिळणाऱ्या वागणूकीबद्दल बऱ्याच चर्चा होत असतात. ‘कास्टिंग काउट’सारख्या प्रकाराला कित्येक अभिनेते अभिनेत्रीसुद्धा बळी पडल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात स्त्रियांबरोबर केल्या जाणाऱ्या वागणुकीची चर्चा सुरु झाली आहे. त्यात सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक दिग्दर्शक एका अभिनेत्रीला बळजबरीने कीस करत असताना दिसत आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. त्यामुळे पुन्हा या इण्डस्ट्रीत अभिनेत्रीसह होणाऱ्या वर्तवणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.(Director forcefully kisses mannara chopra)
या व्हिडीओत दिसणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण अभिनेत्री मन्नारा चोप्रा आहे. मन्नारने सुरूवातीला हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमवल्यानंतर तेलुगू चित्रपटसृष्टीकडे तिचा मोर्चा वळवला. गेल्या काही वर्षांपासून ती तेलुगू चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. लवकरच तिचा एक तेलुगू चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मन्नार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरच्या प्रदर्शिनावेळी घडलेल्या एका प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
वाचा – काय घडला नेमका प्रकार?(Director forcefully kisses mannara chopra)
Director kisses an actress earlier today!pic.twitter.com/JzyBbau45d
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) August 28, 2023
या व्हिडीओत चित्रपटाचे दिग्दर्शक ए. एस. रवीकुमार चौधरी हे मन्नारासह फोटोसाठी पोज देत होते. पण त्यानंतर त्यांनी मन्नाराला जबरदस्ती कीस केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मन्नाराही अचंबित राहिली. तिच्या परवानगी शिवाय घडलेल्या या प्रकारावर सगळीकडूनच संताप व्यक्त होत आहे. दिग्दर्शकाने तिच्यासह केलेल्या प्रकाराचा सोशल मीडियावरही नेटकरी कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्याने तर ‘अशा लोकांवर लगेच कारवाई करायला हवी’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं की, ‘कॅमेऱ्यासमोर ही अवस्या आहे तर मग बंद दरवाज्यामागे काय काय चालत असेल?’ असा प्रश्न उपस्थित केला.
मन्नाराने विवेक अग्निहोत्री यांच्या ‘जिद’ चित्रपटातून बॉलिवूडमध्य पदार्पण केलं होतं. यानंतर ती बॉलिवूडच्या कोणत्याही चित्रपटात झळकली नाही. त्यानंतर ती दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली. आता येणाऱ्या चित्रपटात तिच्यासह राज तरूण हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मकरंद देशपांडे हे खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.