ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. ती विविध व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या प्रत्येक व्हिडीओत नेहमी तिचा नवीन ड्रामा पाहायला मिळतो. त्यामुळे तिचे हे पब्लिसिटी स्टंट बरेच चर्चेत असतात. सध्या ती उमराह करण्यासाठी मक्का येथे गेली होती. त्यावेळी तिने मक्केतील अनेक व्हिडीओ शेअर केले होते. त्यात ती रडताना व प्रार्थना करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. उमराह करून राखी पुन्हा मुंबईत परतली. त्यानंतर तिचं विमानतळावर तिच्या मैत्रिणी व चाहत्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं.राखी परतल्यानंतर काय नवीन करणार याकडे सगळ्यांच लक्ष होतं. यावेळी तिच्या चाहत्यांनी राखी नावाने आवाज दिला त्यावर तिने राखी न म्हणता फातिमा म्हणून हाक मारण्याचा सल्ला दिला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.(Rakhi trolled on social media)
यावेळी राखीने पूर्णपणे पांढरा ड्रेस घातला होता. ती विमानतळाच्या बाहेर येताच एक व्यक्ती तिला फुलांची माळा घालण्यासाठी पुढे आली. पण तिने ती माळ घालून न घेता मागे हटून ती माळा आपल्या हातात घेतली. त्यानंतर तिला एक महिलेने माळा घातली तेव्हा तिने ती माळ घालून घेतली.
तिला यावेळी एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तिने कागदपत्रांवरचं तिचं नाव बदलून घेतलं का? यावर ती म्हणाली की, ‘देवाने मला असे बनवले आहे. मी जशी आहे तसाच तो माझ्यावर प्रेम करतो. मी कागदपत्रात माझे नाव बदलावे असं त्याला वाटत नाही’.
आणखी वाचा – छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार विकी कौशल?, चित्रपटाच्या तयारीला सुरुवात
अनेकांनी या व्हिडीओला नेहमीप्रमाणेच तिचा पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने तर तिच्या या व्हिडीओवर कमेंट केला की, ‘नागपूरात वेड्यांसाठी खूप चांगलं हॉस्पिटल आहे’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘परत आली ड्रामेबाझ’ म्हणत हसण्याचे इमोजी पाठवले.