बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘जवान’चा ट्रेलर अखेर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून सोशल मीडियावर या ट्रेलरची जोरदार चर्चा होत आहे. शाहरुख या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारताना दिसत आहे. पण या चित्रपटात शाहरुखच्या तोंडी एक डायलॉग आला, ज्याचा संबंध नेटकरी थेट एका मोठ्या अधिकाऱ्यांसोबत जोडत आहेत. (Jawan Trailer)
अटली दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना ॲक्शन सीन्स, डायलॉग्स, देशभक्ती व अभिनेत्याचा आगळावेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटात शाहरुखच्या तोंडी एक डायलॉग आहे. ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर…’, असा डायलॉग शाहरुख त्याच्या अंदाजात म्हणतो. शाहरुखचा हाच डायलॉग सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत असून नेटकऱ्यांनी या डायलॉगचा संबंध थेट सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी जोडला आहे.
हे देखील वाचा – Video: राखीने म्हणून सोडला हिंदू धर्म म्हणाली, “मी खूप नशीबवान…”; हिंदू धर्मावरील ‘या’ वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल
शाहरुखच्या या डायलॉगवर नेटकऱ्यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणतो, “आम्हाला माहीत आहे की हा डायलॉग कोणासाठी आहे.”. तर आणखी एक नेटकरी यावर म्हणाला, “या डायलॉगमधून शाहरुखने समीर वानखेडे यांना इशारा दिला आहे.” तर एक नेटकरी म्हणत आहे की, “हॅलो समीर वानखेडे, शाहरुख तुम्हाला काहीतरी सांगत आहे.” नेटकऱ्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून शाहरुखसह समीर वानखेडेदेखील चर्चेत आलेले आहेत.
हे देखील वाचा – ‘रंग माझा वेगळा’ मालिका निरोप घेणार असल्याने अभिनेत्री रेश्मा शिंदे भावुक, म्हणाली, “ही गोष्ट कायम…”
एनसीबीचे माजी विभागीय संचालक असलेले समीर वानखेडे यांनी शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. त्यावेळी तो याच चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. पुढे आर्यनला या प्रकरणी क्लीनचिट मिळाला आहे. पण समीर वानखेडे यांच्यावर २५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून त्याचा खटला सध्या सुरू आहे.(Jawan Trailer)