लेखक, अभिनेता, दिग्दर्शक अशा तीनही जबाबदाऱ्या पेलवत प्रवीण तरडे सिनेविश्वात सक्रिय असतात. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटांमुळे प्रवीण तरडे यांना लोकप्रियता मिळाली. मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या नावाचा डंका आहे. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीवर रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. विशेष म्हणजे ग्रामीण भागावर भाष्य करण्याकडे त्यांचा कल अधिक असतो. शिवाय ऐतिहासिक चित्रपटांमध्येही त्यांचा विशेष रस आहे. (pravin tarde post)
आज प्रवीण तरडे यांनी एका वेगळ्याच विषयावर भाष्य करत पोस्ट शेअर केली आहे. आज त्यांनी कोरोना महामारीवर भाष्य करणारी पोस्ट टाकली आहे. आणि त्यांच्या या आगळ्यावेगळ्या पोस्टने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतले आहे. कोरोना गेल्यानंतर तब्बल एक वर्षाने त्यांनी पुन्हा एकदा कोरोना महामारीवर पोस्ट शेअर केली आहे. आता एक वर्षाने त्यांनी ही पोस्ट का शेअर केली असेल असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे.
पहा काय आहे तरडेंची पोस्ट – (pravin tarde post)
२०२० मध्ये कोरोना महामारीने पळता भुई करून सोडले. अनेकांना त्यांचे प्राणही गमवावे लागले तर काही ठिकाणी कुटुंबाची कुटुंब उध्वस्त झाली. दरम्यान या काळात सगळ्याच क्षेत्राला पूर्णविराम लागला होता. एकमेकांना आधार देत प्रत्येकजण माणुसकी जपण्याचा प्रयत्न करत होते. या महामारीला जवळ न येऊ देण्यासाठी गरम पाणी पिण्याचे सल्ले दिले जायचे. आता प्रवीण तरडेंनी दिलेल्या पोस्टमध्येही त्यांनी असाच काही सल्ला दिलेला आहे.(pravin tarde post)
प्रवीण तरडे यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय, ”गरम पाणी, चहा, काॅफी पीत रहा आणि एकटं राहून स्वत:ची काळजी घ्या … हा कोरोना थोडा खतरनाक आहे दोस्तांनो..” असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रवीण तरडे यांनी शेअर केलेली ही पोस्ट पाहून सर्वानाच चकित केले आहे.(pravin tarde post)
====
हे देखील वाचा – कपड्यांचे नखरे बघून, अशोफ सराफ मिलिंद गवळींना म्हणाले….”
====
कोरोना महामारीला वर्ष झाल्यानंतर तरडेंनी ही पोस्ट का शेयर केलीय आणि या पोस्टसोबत त्यांनी त्यांचा चहाचा कप हातात असलेला एक फोटोही शेअर केला आहे. त्यांच्या या फोटो पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. ‘’काही दिवस मागे गेले सर तुम्ही कामाच्या व्यापात….. थोड एक दोन वर्ष पुढे या… सरसेनापती सुद्धा प्रदर्शित झालेला आहे..’’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर काहींनी ‘तुमचं अकाऊंट हॅक केलं आहे का’ असेही विचारलं आहे. तर एका युजरने असे म्हटले आहे की, “ही पोस्ट तुम्हीच केलीय ही हॅकर ने.. कारण तुमच अकाउंट हॅक झालय’ अशी बातमी ऐकण्यात आलीय..”(pravin tarde post)
आता तरडेंनी ही पोस्ट का केली असेल नक्कीच यामागे काहीतरी कारण असणार. कदाचित प्रवीण तरडे लवकरच नवा चित्रपट घेऊन येणार असतील आणि तो कोरोना महामारीवर असेलही, नेमकं या पोस्ट मागच कारणं काय असेल, याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.