बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चैतन्यचा मोठा निर्णय, सुभेदारांच्या आनंदात मिठाचा खडा पडला अन्…; सायली-अर्जुनवर नवं संकट, पुढे काय घडणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 26, 2024 | 11:05 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

चैतन्यचा मोठा निर्णय, सुभेदारांच्या आनंदात मिठाचा खडा पडला अन्…; सायली-अर्जुनवर नवं संकट, पुढे काय घडणार?

‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणाने आता साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. चैतन्यने सुभेदारांच्या घरी येऊन केलेल्या खुलास्याने साऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तर अर्जुन व सायलीला चैतन्यने सांगितलेली बातमी ऐकून खूप मोठा धक्का बसला आहे. मालिकेत सायली व अर्जुन यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत असताना यांत मिठाचा खडा पडला असल्याचं समोर आल्याने मालिकेत एक रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. अर्जुनला बरे वाटावे म्हणून सायली १५ मिनिटांच्या डेटवर घेऊन जाते. त्यांचं प्रेमाचं नातं बहरत असतानाचं मालिकेत ट्विस्ट आलेला आहे. (Tharal Tar Mag Serial Update)

चैतन्यने सुभेदारांकडे येऊन खूप मोठा धक्का दिलेला आहे. चैतन्य सुभेदारांकडे येत म्हणतो की, “प्रताप काका, कल्पना मावशी, पूर्णा आजी मला जेव्हापासून आठवत आहे तेव्हापासून तुम्हीच माझे कुटुंब आहात. मी माझ्या आयुष्यात नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे आणि तो प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. मी आणि साक्षी साखरपुडा करणार आहोत”. चैतन्यने हा खुलासा करताच अर्जुन-सायलीसह संपूर्ण सुभेदार कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकते.

आणखी वाचा – अहिल्यादेवींना वाचवून पारूचा जीव धोक्यात, प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं अन्…; आदित्य तिला वाचवू शकेल का?

View this post on Instagram

A post shared by ठरलं तर मग..!!???? (@tharlatarmag_official)

याआधी अर्जुन-सायलीने अनेकदा चैतन्यला साक्षीपासून दूर राहण्याचा सल्ला दिलेला असतो, मात्र चैतन्य कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. साक्षीच्या प्रेमात तो पूर्णपणे आंधळा झाल्याने तो कोणाचेही काहीच ऐकून घेत नाही. अर्जुन-सायलीला साक्षीविरोधात पुरावा सापडतो की ती कुणालची गर्लफ्रेंड होती आणि तिच्यामुळेच त्याने आत्महत्या केली. हा पुरावा ही गोष्ट अर्जुन चैतन्यला सांगण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे सत्य चैतन्यपर्यंत पोहोचत नाही. आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होतं.

आणखी वाचा – भाचीच्या लग्नात मामाचीचं हवा! अखेर आरती सिंहच्या लग्नात पोहोचला गोविंदा, मीडियासमोर येत म्हणाला, “देवाकडे प्रार्थना करतो की…”

आता चैतन्य साक्षीने आखलेल्या या ट्रॅपमध्ये फसणार का?, तो साक्षीबरोबर साखरपुडा करणार का?, विलास खुनाच्या केसमध्ये साक्षीचा हात असल्याचं समोर येईल का?, की अर्जुन चैतन्यची साक्षीपासून सुटका करेल?, हे सर्व मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialstar pravahtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Amruta Bane On Father In Law

Video : सुप्रासिद्ध मराठी सेलिब्रिटी जोडपं लग्नबंधनात, लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी सासऱ्यांनीचं सजवला बेडरूम, थेट व्हिडीओच केला शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.