मराठी मनोरंजन विश्वात गेल्या अनेक दिवसांपासून लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळालं. अशातच सिनेसृष्टीतील एक कलाकार जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली. अभिनेत्री अमृता बने व अभिनेता शुभंकर एकबोटे यांचा शाही विवाहसोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला. अमृता बने व शुभंकर एकबोटे या मालिकेतील ऑनस्क्रीन कपलने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. (Amruta Bane On Father In Law)
अमृता व शुभंकरचा पुणेरी थाटात शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनीही हजेरी लावलेली दिसली. अमृता ही मूळची मुंबईची असून शुभंकर हा अस्सल पुणेरी मुलगा आहे. विशेष म्हणजे तो दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे. अश्विनी यांनी मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक उत्तम कलाकृती सादर केल्या होत्या. लेकाच्या लग्नात अश्विनी यांची उणीव नक्कीच भासली. मात्र लेकाच्या लग्नात आईची कमतरता त्याच्या वडिलांनी भरुन काढलेली दिसली.
अशातच सासऱ्यांच कौतुक करणारा एक व्हिडीओ त्यांच्या सूनेने म्हणजे अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ गमतीशीर असून या व्हिडीओमध्ये अमृता व शुभंकरच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्री थेट तिच्या शुभंकरच्या वडिलांना तयारी केली असल्याचं समोर आलं आहे. व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, त्यांनी शुभंकर व अमृतासाठी खास बेडरूम तयार केला असून त्यात एका बोर्डवर #अशु थांबायचं नाय गाड्या थांबायचं नाय. #दे धक्का. ऑल द बेस्ट. आजोबा तयार होऊन बसलाय”, असं लिहिलेलं दिसलं. अमृताने हा व्हिडीओ शेअर करत #सासरेखासरे असं म्हणत “तुमच्या सासऱ्यांनी केली आहे का तुमच्या लग्नाची पहिली सजावट?”, असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केला आहे.
लग्नात अमृता व शुभंकर यांनी पुणेरी पारंपरिक पोशाख परिधान केलेला पाहायला मिळतोय. गुलाबी साडीत अमृताच रूप खुलून आलेलं दिसलं. शुभंकरही पुणेरी फेट्यात अगदी राजबिंडा दिसत होता. तर रिसेप्शनसाठी दोघांनी साऊथ इंडियन लूक केला होता. नववधूवरांच्या साऊथ इंडियन लूकसह उपस्थित नातेवाईक व कुटुंबियांना साऊथ इंडियन लूक केलेला पाहायला मिळाला.