महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रमावर महाराष्ट्रातील सर्वच प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजनही करतात. या कार्यक्रमातील अभिनेत्री नम्रता संभेरावही तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकते. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील लॉली या भूमिकेसाठी नम्रता चांगलीच चर्चेत असते. कॉमेडी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या नम्रताने कलाश्रेत्रात स्वतःचे स्थान स्वतः कमावले आहे.(namrata sambherao)
नम्रता सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. तसेच अधून मधून चित्रपटांमध्येही काम करते. सोशल मीडियावरून नम्रता तिचा मुलगा रुद्राजचे बरेच व्हिडीओ शेअर करत असते. आताही रुद्राजचा एक क्युट व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. तिच्या लेकाच्या या व्हिडीओला कलाकारांनी आणि नेटकऱ्यांनीही उत्तम प्रतिसाद दिलेला पाहायला मिळतोय. रुद्राज या व्हिडीओमध्ये मधुमेहाचा अर्थ त्याच्या भाषेमध्ये सांगताना दिसत आहे.
पहा काय म्हणाला नम्रताचा लेक – (namrata sambherao)
नम्रताने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “रुद्राज लहान मुलांना सांगत आहे की, बाहेरचं खाऊ नका. फक्त डायबिटीजचा अर्थ त्याने काय लावला आहे हे कळालं नाही”. रुद्राजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील त्याचे बोबडे बोल ऐकणं रंजक ठरतंय.(namrata sambherao)
या व्हिडीओवर अनेक कलाकार मंडळींनीही कमेंट केल्या आहेत. बहुतेक डायबिटीजचा अर्थ दात पाडणे असावा अशी कमेंट स्पृहा जोशीने केली आहे. तर रुद्राज रॉक असं समीर चौघुले यांनी म्हटलं आहे. तर प्रसाद खांडेकर याने व्हिडिओला हार्ट ईमोजी पाठवला आहे. याआधीही नम्रताने रुद्राजचे बरेच व्हिडीओ शेअर केले आहेत.
====
हे ही वाचा – रंगभूमीवर लागू होणार ‘नियम व अटी’! संकर्षण कऱ्हाडे लिखित नवीन नाटकाची घोषणा
====
नम्रता संभेराव ही अभिनेत्री शो असो किंवा नाटक कुठेही प्रेक्षकांना हसवण्यासाठी जीवतोड मेहनत घेताना दिसते. ती सोशल मिडियावरही चांगलीच सक्रीय असते. महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये ती कधी लॉली बनून प्रेक्षकांना पोट धरून हसवते तर कधी तिची साध्या आईची भूमिकासुद्धा भाव खाऊन जाते. (namrata sambherao)
तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे प्रसिद्धी मिळाली असली तरी तिने अनेक नाटकांमध्ये देखील विविध भूमिका साकारल्या आहेत. ही नाटक हाऊसफुलही ठरली आहेत. तर बॉक्स ऑफिसवर धमाका करणाऱ्या ‘वाळवी’ चित्रपटात ही नम्रताने काम केले आहे.(namrata sambherao)