शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कपड्यांचे नखरे बघून, अशोफ सराफ मिलिंद गवळींना म्हणाले….”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 28, 2023 | 10:59 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
milind gawali ashok saraf

milind gawali ashok saraf

‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. मिलिंदच्या या मालिकेतील अनिरुद्ध या भूमिकेमुळे तो चांगलाच चर्चेत असतो. त्याची ही ग्रेड दर्शविणारी भूमिका संमिश्र प्रतिक्रिया मिळवताना दिसते. मिलिंद गवळी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतो. बरेचदा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभव वेगवेगळे प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यावेळी देखील त्यांनी असाच एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी त्यांनी अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या अंगी असलेली चुकीची सवय मोडण्यासाठी मदत केली असल्याचे सांगितले आहे.(milind gawali ashok saraf)

‘लहानपणापासून आपण आपल्याबद्दल एक धारणा तयार करतो, अमुक अमुक गोष्टी आपल्याला आवडतात, अमुक आवडतच नाही, लहानपणीच आपलं ठरलेलं असतं की या या भाज्या आपल्याला आवडतात या आवडत नाही, काहींना गोड आवडतं काहींना तिखट आवडतं, असंच आवडतं आपण असेच आहोत, माझे लहानपणी खाण्यापिण्याचे खूप नखरे होते, आणि आई होतीच माझे लाड पुरवायला, माझ्यासाठी वेगळा स्वयंपाक केला जायचा.

दहावीनंतर वडिलांनी मला नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पाठवलं, पहिल्याच दिवशी ताटात जे जेवण आलं, माझ्याबरोबर अनेकांनी तोंडं वाकडी केली, थोडसं खाल्लं आणि ताटात अन्न टाकून उठलो, मेजर राठोड आले शांतपणे म्हणाले “ खाना पुरा खतम करो, एक दाना भी प्लेट मे नही बचना चाहिए” आणि आम्हाला बंदूक घेऊन मोठ्या ग्राउंडला दहा राऊंड मारायची शिक्षा. त्या दिवसापासून आजपर्यंत खाण्यापिण्याचे माझे सगळे लाड नखरे संपले, ताटात जे येईल ते निमुटपणे खायचं नखरे करायचे नाहीत.

काय म्हणाले अशोक सराफ (milind gawali ashok saraf)

यापुढे बोलताना मिलिंद म्हणाला, ‘पण कपड्यांच्या बाबतीत माझे नखरे चालूच होते, मला हे शोभतं, मला ते शोभत नाही, मी हे घालणार मी हे घालणार नाही, असं बरीच वर्ष चाललं होतं, हा रंग मला आवडतो हा रंग मला आवडत नाही, अनेक वर्ष सिनेमांमध्ये मी माझे स्वतःचेच कपडे घेऊन जायचं कारण कपड्यांसाठी मराठी सिनेमाचं बजेट खूप कमी असायचं त्यामुळे त्यांचे साधे स्वस्तातले कपडे मला कधीच आवडले नाहीत, ती माझी सवय अशोक सराफांमुळे मोडली, माझे कपड्यांचे नखरे बघून ते एक दिवस मला म्हणाले “प्रेक्षक कपडे नाही अभिनय बघतात अभिनयाकडे लक्ष दे, मी दोन झब्बा पायजमा वर hit सिनेमे केले आहेत “

====

हे ही वाचा – ‘माझा मित्र लक्ष्मीकांत….’ पोस्ट शेअर करत या बॉलिवूड अभिनेत्याने काढली लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण

====

आणि त्यानंतर सिनेमा असो सिरीयल असो मी मला जे कपडे ते देतील ते आजपर्यंत निमूटपणे घालत आलो. पण वैयक्तिक जीवनात मला माझ्याच choice चे कपडे घालायला आवडायचे, पण “ आई कुठे काय करते “ दरम्यान बरेचसे events केले. अनेक designers ने माझ्यासाठी costumes create केले . जे माझ्या comfort zone च्या पलीकडचे होते, भोसला मिलिटरीतले मेजर राठोड सारखेच माझे डिझायनर आहेत, डिझायनर भाग्यश्री, दर्शना शानबाग, प्रणिता तन्मय… अधिकाराने आणि हक्काने मला experiments करायला सांगतात.

milind

मिलिंद यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलंय की त्याला ‘आई कुठे काय करते’ मालिकेसाठी वेगवेगळ्या कॉस्च्युमची एक्सपेरीमेंट्स करायला मिळाली. कंफोर्ट झोनच्या बाहेर जाऊन त्याने काहीतरी वेगळं ट्राय केलं. मिलिंदला स्वपसंतीचे कपडे घालायला आवडतात, त्याच्या या सवयीमुळे इंडस्ट्रीमध्ये आल्यावर त्याला अशोक सराफांचा ओरडा पडला.(milind gawali ashok saraf)

Tags: aai kuthe kay karteashok sarafentertainmnetits majjamarathi malikamarathi serialmilind gawalistar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
sukanya mone

'आज तू सातासमुद्रापार…' लेकीच्या आठवणीत सुकन्या मोनेंची खास पोस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.