शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुम्ही परत याल अशी आशा…”, विकास ढाकणे यांच्या बदलीनंतर प्रशांत दामलेंना मोठा धक्का, म्हणाले, “त्यांचं काम…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 21, 2024 | 6:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
prashant damale post

“तुम्ही परत याल अशी आशा...”, विकास ढाकणे यांच्या बदलीनंतर प्रशांत दामलेंना मोठा धक्का, म्हणाले, “त्यांचं काम...”

पुण्यात नाट्यरसिकांची कमी नाही असं म्हणतात. पण पुण्यामध्ये रसिक प्रेक्षकांना नाटकांचा आस्वाद घेता यावा तेथील प्रशासकीय अधिकारीही प्रयत्नशील आहेत. त्यापैकी एक प्रशासकीय अधिकारी म्हणजे पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.विकास ढाकणे. ते एक मोठे नाट्यरसिक आहेत. त्यांच्या नाट्यप्रेमामुळे पुण्यातील ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृह’ व ‘अण्णाभाऊ साठे नाट्यगृह’ हे योग्य स्थितीत आणण्यासाठी त्यांनी मोठा हातभार लागला आहे. अशातच त्यांची आता बदली झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.  (prashant damale post)

पुणे महापालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांची एकाचा वेळी बदली झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. डॉ.कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता नागपूर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही बदली करण्यात आली असल्याने अभिनेते प्रशांत दामले यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे आणि त्यांच्यासाठी पोस्टही केली आहे.

आणखी वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’मधील उमाच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याचं सारा अली खानबरोबर चित्रपट काम, अभिनेत्रीकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाली, “अभिमान…”

प्रशांत यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. विकास ढाकणे यांच्या बदलीने धक्का बसला. सर्वसामान्य नागरिकांसाठी ते काम करायचेच पण त्याशिवाय आमच्यासाठी त्यांची ओळख उत्तम नाट्यरसिक अशीच होती आणि त्यांच्या रंगभूमीच्या प्रति असलेल्या प्रेमामुळे पुण्यातील ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृह’ आणि ‘अण्णाभाऊ साठे नाट्यगृह’ सुस्थितीत आहेत.  त्याचबरोबर आता ‘बालगंधर्व रंगमंदिर’ पण उत्तम स्थितीत येत आहे. विकास सर आम्ही तुम्हाला मिस करणार आहोत. तुम्ही परत याल अशी आशा बाळगतो”. प्रशांत यांच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

आणखी वाचा – Video : इतकं मोठं आणि प्रशस्त आहे राहुल वैद्यचं घर, लेक सहा महिन्याची झाल्यानंतर कुटुंबियांबरोबर घरातच जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

विकास ढाकणे यांची बदली झाल्यानंतर ही बदली रद्द व्हावी यासाठी नागरिकही रस्त्यावर उतरले आहेत. शहरातील संस्था, संघटना ढाकणे यांची बदली रद्द व्हावी यासाठी मागणी करत आहेत. विकास ढाकणे यांनी सव्वा वर्षापूर्वी अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. ते स्वतः नाट्यरसिक असल्याने त्यांनी रसिकप्रेक्षकांसाठी खूप काम केले होते. दरम्यान प्रशांत दामले यांच्या पोस्टची काही दाखल घेण्यात येईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags: administrative officerfacebook postmarathi actorPrashant damale
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Randeep hudda on aishwarya rai bachchan

ऐश्वर्या रायबरोबर अधिक मैत्रीपूर्ण नातं निर्माण न झाल्याबाबत रणदीप हुड्डाचं वक्तव्य, म्हणाला, "ती जशी आहे तसं दाखवण्याचा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.