टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे गायक राहुल वैद्य व अभिनेत्री दिशा परमार. राहुल वैद्य व दिशा परमार ही जोडी ‘बिग बॉस’ हिंदीमुळे विशेष चर्चेत आली. ‘बिग बॉस’च्या घरात राहुल व दिशा यांच्यातील प्रेम वाढत गेलं. त्यांनतर ही जोडी खऱ्या अर्थाने एकत्र आली. ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर ही जोडी अखेर लग्नबंधनात अडकली. दोघांच्या लग्नाचीही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. राहुल व दिशा ही जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. (Rahul Vaidya And Disha Parmar Daughter)
गेल्यावर्षी दोघांनी आई-बाबा झाल्याची गुडन्यूजही चाहत्यांसह शेअर केली. दोघांना एक खूप सुंदर अशी लेक असून त्यांनी या नव्या पाहुण्याचं जल्लोषात आगमन केलं. दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाला जन्म देण्याआधी राहुल व दिशाने सोशल मीडियावर बेबी बंप आणि सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना बाळ होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. यानंतर अभिनेत्याच्या घरी थाटामाटात दिशाच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रमही पार पडला.
२० सप्टेंबरला दिशा आई झाली. त्यानंतर ५५ दिवसांनी दिशा व राहुल त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचं बालदिनाच्या मुहूर्तावर बारसं केलं. दिशा व राहुल यांनी त्यांच्या लेकीचं नाव नव्या असं ठेवलं आहे. आज राहुल व दिशांची लेक सहा महिन्यांची झाली आहे. दोघांनी तिच्याबरोबरचे काही खास फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दिशा व राहुल नेहमीच सोशल मीडियावरुन त्यांच्या लेकीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असतात.
दिशा व राहुल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लेक नव्याच्या सहा महिन्याच सेलिब्रेशन केलं आहे. घरच्याघरी सर्व कुटुंबियांच्या समवेत त्यांनी हे सेलिब्रेशन केलं आहे. यावेळी त्यांनी लाडक्या लेकीसाठी केकही कट केलेला पाहायला मिळाला. यावेळी त्यांच्या लेकीचा क्युट अंदाजही खूप खास होता. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत नव्याच कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. यावेळी संपूर्ण वैद्य कुटुंब खूप आनंदात असल्याचं पाहायला मिळालं.