अभिनेता, दिग्दर्शक आणि गायक म्हणून अभिनेता प्रसाद ओक याने स्वतःची ओळख स्वतः निर्माण केली. अभिनय, दिग्दर्शनाची आवड असलेल्या प्रसादला गायनाचे धडे लहानपणापासून मिळाले आहेत. आई संगीत विशारद असल्याने आणि शाळेत आई संगीताची शिक्षिका असल्याने प्रसादवर संगीताचे अधिक संस्कार झालेत असं म्हणणं वावगं ठरणार नाहीत. संगीताकडे प्रसादचा कल अधिक असला तरी शास्त्रीय संगीताचा त्याला जणू तिटकाराच होता. याबाबतचा एक किस्सा प्रसाद ओक याने एका मुलाखतीदरम्यान सांगितला. चला तर जाणून घेऊया नेमका काय आहे तो किस्सा आजच्या जपलं ते आपलं या भागात.(Prasad Oak Shares Incident)
प्रसाद ओक याला क्लासिकल संगीताचा तिटकारा होता, त्याचा जास्त कल भावगीते, लोकगीते यांकडे होता. त्यात त्याची आई संगीत विशारद होती. त्यामुळे संगीताचं थोडं दडपण होतंच. याबाबत बोलताना प्रसाद म्हणाला, एकदा शाळेत आठवी इयत्तेत शिकत असताना, गॅदरिंगला गाणं बसवायचं काम माझ्याकडे सोपवलं होत, शिक्षकांना माहित होत की हा चांगला गातो त्यात आई संगीत शिक्षिका असल्याने गाणं मीच बसवून घेणार असं त्यांचं म्हणणं होत. त्यात मला शास्त्रीय संगीत आवडत नाही आणि त्यात मला तेच बसवायला सांगितलं होत.
पाहा प्रसादने का एक रात्र काढली सारसबागेत (Prasad Oak Shares Incident)
आणि मी काही ते बसवलं नाही, उद्या शाळेत गेल्यावर ओरडा पडनार आई पण ओरडणार या भीतीने घरातून पळून जात संपूर्ण एक रात्र मी सारस बागेत काढली, रात्री मी तिथेच गणपतीच्या मंदिरात बाकड्यावर झोपी गेलो. (Prasad Oak Shares Incident)
माझी काकी सकाळी गणपतीच्या मंदिरात येते, तिला मी तिथं झोपलेला दिसलो, रात्रभर घरातले मला शोधत होते, हा सगळं सीन झाल्यावर आईने विचारलं तू असं का वागला, तेव्हा मी म्हणालो मला नाही गायचं आहे शास्त्रीय संगीत, तेव्हा ती म्हणाली, तसं सांगायचं ना मग, यावर मी म्हणालो, सांगितलं असत तर तू ओरडली असती, परत तुझी ती चिडचिड. म्हणून मी पळून गेलो. त्यानंतर मी गायलो पण लोकगीते, भावगीते.
हे देखील वाचा – तीर्थयात्रेला न जाता निवेदिता पोहचल्या लंडनला
शास्त्रीय संगीत न आवडणारा प्रसाद हा सारेगमप सेलिब्रिटी राउंड चा विनर आहे हे विसरून चालायचं नाही.