महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या त्रिकुटाचा गाजलेला सिनेमा म्हणजे धुमधडाका. धुमधडाकानंतर या त्रिकुटाला घेऊन पुन्हा नवीन कलाकृती सादर करण्याकडे महेश कोठारे यांचा अधिक कल होता. चित्रपट चांगला होण्यासाठी वैयक्तिक आणि भावनांच्या आहारी जाता कामा नये हे एखाद्या फिल्म मेकरने आवर्जून लक्षात ठेवावी अशी बाब आहे, यासंबंधित एक किस्सा महेश कोठारे यांनी त्यांच्या डॅम इट आणि बरच काही या पुस्तकात सांगितला आहे, चला तर जाणून घेऊया काय आहेत तो किस्सा आजच्या जपलं ते आपलं या भागात.(ashok saraf incidence)
महेश कोठारे यांनी दे दणादण चित्रपट करायचा ठरवलं. मात्र या चित्रपटाला अशोक मामांकडून अपेक्षित असा प्रतिसाद आला नाही. हे महेश कोठारे यांना जाणवलं. माझ्याकडे आता तारखा नाहीत या अशोक मामांच्या वाक्याने महेश कोठारे यांच्या मनात नाराजीची भावना तयार झाली. धुमधडाकाचं मोठं यश आणि त्यांच्यातील मैत्री या दोन गोष्टींमुळे अशोक मामा या चित्रपटासाठी होकार देतील असं कोठारेंना वाटलं होत. मात्र अशोक मामांनी काढलेला नकारात्मक सूर हा कोठारेंच्या इगो पुढे आडवा आला. आणि ही गोष्ट त्यांच्या मनात सलत राहिली.
पाहा का कोठारेंनी मामांना चित्रपटातून काढून टाकण्याचा घेतला निर्णय (ashok saraf incidence)
तरी कोठारेंनी अशोक सराफ यांनी समोर ठेवून दे दणादणची कथा लिहायला सुरुवात केली. मात्र ती व्यक्तिरेखा कित्येक दिवस डेव्हलप होतच नव्हती. शेवटी कोठारेंनी अशोक मामांची व्यक्तिरेखा चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. चित्रपट चांगला होण्यासाठी वैयक्तिक आणि भावनांच्या आहारी जाता कामा नये हे जरी खरं असलं तरी दरम्यान महेश कोठारेंच्या हातून खूप मोठी चूक घडली होती. (ashok saraf incidence)
कोठारेंनी अशोक मामांबद्दल सुरु असलेली ही घडामोड त्यांना विश्वासात घेऊन सांगायला हवी होती. याबाबत बोलताना महेश कोठारे यांनी त्यांच्या डॅम इट आणि बरच काही या पुस्तकात म्हटलंय की, ‘दे दणादण’ मधून ‘अशोक’ची व्यक्तिरेखा कमी करण्याचा माझा निर्णय बरोबरच होता; परंतु तसं करताना एक मोठी चूक माझ्या हातून घडली होती. अशोकच्या व्यक्तिरेखेबद्दलची ही घडामोड मी त्याला विश्वासात घेऊन सांगायला हवी होती. तसं माझ्याकडून घडलं नाही. (ashok saraf incidence)
हे देखील वाचा – तारखा नाहीत म्हणणाऱ्या लक्ष्याला कोठारेंच्या ऑफरने घातली भुरळ
एकीकडे मी त्याला माझा जवळचा मित्र मानलं होतं आणि मीच त्याला अंधारात ठेवून त्याला ‘दे दणादण मधून वगळण्याचा निर्णय परस्पर घेतला होता. ही चूक मान्य करण्यात आता मला थोडाही कमीपणा वाटत नाही. ‘तू या चित्रपटात नसशील!’ हे मी त्याला चांगल्या पद्धतीनं सांगू शकलो असतो; पण मी तसं केलं नाही. अशोकनही या गोष्टीचा पुन्हा माझ्याकडे कधी उल्लेख केला नाही; पण ही गोष्ट त्यानं मनात ठेवली, हे मला नंतर हळूहळू त्याच्या वागण्यावरून जाणवायला लागलं; पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
