छोटा पडदा गाजवणारी आणि नाटक सिनेमामधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ. साध्या सोज्वळ स्वभावाने आणि उत्तम अभिनय कौशल्याने निवेदिता यांनी त्यांचा चाहतावर्ग तयार केला आहे. लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री सध्या छोटा पडदा गाजवतेय. कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये निवेदिता पाहायला मिळत आहेत. या मालिकेतील त्यांची रत्नमाला मोहिते ही भूमिका विशेष चर्चेत आहे.(Nivedita Saraf London Trip)
मालिकेत एकामागोमाग एक आलेले ट्विस्ट सार्यांनीच पाहिले. अशातच मालिकेत आलेल्या नव्या रंजक वळणांमध्ये रत्नमाला म्हणजेच निवेदिता या मालिकेतील कथानकानुसार तीर्थयात्रेला गेल्या आहेत. त्यामुळे कथानकात मालिकेत आलेलं रंजक वळण त्यांना न सांगणायच इतर पात्र एकमेकांना सांगत असतात. मात्र निवेदिता या मालिकेच्या कथानकात तीर्थयात्रेला गेल्या असल्याचं दाखवण्यात आलं असलं तरी त्या खऱ्या आयुष्यात लंडन येथे गेल्या आहेत. लंडन येथे पोचून त्यांनी त्यांचा एक फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. हाय फ्रॉम लंडन असं कॅप्शन देत त्यांनी लंडन येथील फोटो पोस्ट केला आहे.
पाहा चाहते निवेदिता यांच्या पोस्ट काय म्हणाले आहेत (Nivedita Saraf London Trip)
त्यांचा हा लंडन येथील फोटो पाहून चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर कमेंट करायला सुरुवात केली आहे. मालिकेत त्या तीर्थयात्रेला गेल्याच दाखवल्याने त्यांची लंडन स्वारी पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका चाहत्याने कमेंट करत म्हटलंय की, भाग्य दिले मध्ये सांगत आहेत की तुम्ही तीर्थयात्रेला गेल्या आहेत.(Nivedita Saraf London Trip)
तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलंय, आता मला समजलं की, तुम्ही तीर्थयात्रेला गेला आहात असं का सांगितलं तर तुम्ही लंडनला गेला आहेत, इकडे राज वर संकट ओढावलाय, तर कावेरीची स्मृती गेली आहे, तर काका काकू आणि सानियाच नाटक सुरूच आहे, तुम्ही परत घरी या आणि त्या तिघांना घराबाहेर काढा. अशा कमेंट केल्या आहेत.
हे देखील वाचा – मानसी नाईक पुन्हा रिलेशनशिपमध्ये?
कलाकारांना ही त्यांच्या शुटींगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून कामानिमित्त जावंच लागत. अशातच निवेदिता या ही त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून लंडन येथे गेल्या आहेत.