बुधवार (१५ नोव्हेंबर) रोजी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत भारताने एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या या उत्कृष्ट खेळीवर संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय संघाच्या या दमदार कामिगरीबद्दल सामान्य लोकांपासून ते अगदी कलाविश्वातील कलाकार मंडळी भारतीय संघाचं व संघातील खेळाडूंचं कौतुक करत आहेत. अशातच अभिनेते अविनाश नारकर यांनी भारतीय संघासाठी व खेळाडूंसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Actor Avinash Narkar Shared Video On Social Media)
अविनाश हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. ते सोशल मीडियावर त्यांच्या पत्नीसह कधी योगाचे रील्स तर कधी डान्सचे रील्स शेअर करत असतात. त्यांचे हे रील्स सोशल मीडियावर व्हायरलदेखील होतात. अशातच आता त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते भारतीय संघाच्या विजयाबद्दल आनंद साजरा करताना दिसत आहेत.
आणखी वाचा – चाहत्याला फटकावल्यानंतर नाना पाटेकरांचं स्पष्टीकरण, व्हायरल व्हिडीओ पाहून म्हणाले, “मी त्याला मारलं आणि…”
अविनाश यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत ते त्यांच्या गाडीत बसून क्रिकेट सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. या व्हिडीओत भारताच्या विजयानंतरचे समालोचनदेखील ऐकू येत आहे. भारताचा विजय होताच त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. “वोह… येस… इंडिया न्यूझीलंड बरोबरची सेमीफायनल मॅच जितली रे जितली…!” असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर ते ही या व्हिडीओत आनंदाने “इंडिया… इंडिया…” असं म्हणत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओखाली नेटकऱ्यांनीदेखील कमेंट्स करत भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
दरम्यान विराट कोहली व श्रेयस अय्यरच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारतीय संघाने ३९७ धावा केल्या. या विजयाचा शिल्पकार भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ठरला आहे. एकट्या शमीने न्यूझीलंडचे तब्बल ७ खेळाडू बाद केले. प्रतिउत्तरच्या या खेळीत न्यूझीलंड संघ ३२७ धावांमध्ये ऑलआऊट झाला आणि भारतीय संघ विजयी झाला.