‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध या पात्रामुळे अभिनेते मिलिंद गवळी यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मिलिंद यांनी याआधी सिनेविश्वात बरंच काम केलं आहे. अभिनयासोबत मिलिंद यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहणं नेहमीच रंजक ठरत. ते वेगेवगेळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या पोस्ट चाहत्यांसाठी करत असतात. अशातच नुकतीच त्यांनी त्यांच्या खास व्यक्तीसाठी केलेली पोस्ट अधिक लक्षवेधी ठरतेय. मिलिंद यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Milind Gawali Post)
पाहा काय म्हणाले पत्नीबद्दल मिलिंद गवळी (Milind Gawali Post)
मिलिंद यांनी त्यांच्या पत्नीसाठी पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यांनी असं लिहिलं आहे की, दिपा आणि माझा आज लग्नाच्या वाढदिवस. तीन दशकाहून अधिक काळ अशा माणसाबरोबर संसार केला जो गावोगावी जाऊन डोंबाऱ्याच्या खेळा सारखा सिनेमा , सिरीयल चा खेळ करतो आहे , आणि बऱ्याच वेळेला महिने महिने काम करून सुद्धा घरी येताना संसार चालवण्यासाठी काहीच पैसे घरी घेऊन आलेलो नसायचो, बरेचसे प्रोड्युसर मला माझे ठरलेले पैसे सुद्धा द्यायचे नाहीत, आणि आपल्या हक्काचे पैसे मागायची आजही मला सवय नाही आहे, हा संसाराचा गाडा कसा पुढे ढकला असेल , हे खरतर दिपालाच ठाऊक.
हे देखील वाचा – ‘स्वतःचा स्वार्थ आणि प्रसिद्धीसाठी..’ म्हणत इन्फ्लुएन्सर्स वर संतापली अभिज्ञा
पण कधी एका शब्दांनी विचारलं नाही , कधी कुरकुर केले नाही, का कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही, ऊलट काटकसर करायची सवय च लाऊन घेतली, इतकी सवय लागली की आजही पार्टी करायची म्हटली तरी सुद्धा एखादी भेळ, किंवा पाणीपुरी खाल्ली ही समाधान मानते ती. अगदीच आजही कधी तरी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आम्ही जेवलोच तरी एखादं दहा-पंधरा रुपयाचं चोकोबार आईस्क्रीम खाल्लं की मगच चैन वगरे केल्यासारखं वाटतं तिला. आहे त्या परिस्थितीत खूप समाधानी राहायचं हे तिच्याकडून शिकण्यासारखा आहे. (Milind Gawali Post)
कठीण असतंय एका कलाकाराबरोबर संसार करणं, आणि तो कलाकार जर यशस्वी नसेल तर, संसाराचा गाडा पुढे ढकलत राहणार फारच कठीण होत जातं… काम नसायचं त्यावेळेला लोकं मुद्दामून अडूनाडून विचारायची की “काय मग आता घरीच आहेस का ?”, “शूटिंग वगैरे नाही का?” पण त्या काळातही दिपाने मला कधीही जाणव करून दिलं नाही, की मी एक flop Actor आहे , का माझ्याकडे काही काम नाही आहे किंवा मला कोणीही काम देत नाही आहे, बरं मला माझ्या आई-वडिलांनी राजेशाही पद्धतीने वाढवलं असल्यामुळे, स्वतः जाऊन काम मागायची मला सवयच नव्हती, त्यामुळे महिने महिने काहीही काम मिळायचं नाही, सातारा कोल्हापूरचे पिक्चर यायचे त्यात पैसे अगदीच कमी मिळायचे.(Milind Gawali Post)
हे देखील वाचा – बायकोसोबत अभिजीतची थायलंड ट्रिप
आमच्या लग्नाचा वाढदिवस आला की मला जाणवतं की इतकी वर्ष या माऊलीने माझ्या बरोबर किती आनंदाने हा संसार केला, खूप खडतर प्रवास केला आणि आजही करते आहे , तिचे जितके आभार मानू इतके कमी आहेत. दिपा तुला ही आपल्या ३३ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा???? असं म्हणत मिलिंद यांनी त्यांच्या पत्नीचे आभार मानले आहेत.
