आजोबा आणि नातवंडांचं काहीतरी खास नातं असत. आणि याच नात्याची एक आठवण शेअर केली आहे अभिनेत्री जिनिलिया देशमुखने. आज दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा वाढदिवस त्या निमित्त जिनिलियाने रिहान आणि रियाल यांचा विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे.(Vilasrao Deshmukh Grandsons)
फोटोच्या कॅप्शन मध्ये जिनिलिया ने लिहिलं आहे “काही माणसं कधीच सोडून जात नाहीत , वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा, आम्ही प्रत्येक दिवस तुमच्या आठवणीत साजरा करतो”. जिनिलियाने फोटो सोबतच विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन करतानाच देखील एक फोटो पोस्ट केला आहे. या आधी रितेशने विलासराव देशमुख यांच्या आठवणीतील एक व्हिडिओ देखील चांगलाच वायरल झाला होता.
रितेश जिनिलिया नेहमी काही तरी धमाल व्हिडिओ किंवा फोटोज शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी रियाहून आणि रियाल ला मिळालेली काही पारितोषिक त्यांनी आजीला देतानाचा एक व्हिडिओ सुद्दा प्रेक्षकांना खूप आवडला.(Vilasrao Deshmukh Grandsons)