मराठी मनोरंजन विश्वात काही कलाकार असे आहेत जे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या स्पष्टवक्तेपणा मुळे अधिक ओळखले जातात. सध्याच्या परिस्थितीवर वा एवढ्या विषयावर स्पष्टपणे भाष्य करण्यास हे कलाकार कुठेही डगमगत नाहीत. स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी एक लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे. अभिज्ञा ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या पोस्टमुळे ही चर्चेत असते. नुकतीच अभिज्ञाने एक पोस्ट शेअर केली असून ती संतापजनक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.(Abhidnya Bhave Post Viral)
पहा इन्फ्लुएन्सर्सवर का भडकलीय अभिज्ञा (Abhidnya Bhave Post Viral)
अभिज्ञा भावेने शेअर केलेल्या या पोस्टवरून तिने सोशल मीडियावरील रिल स्टार, इन्फ्लुएन्सर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर यांना एक लांबलचक पोस्ट लिहीत तिने त्यांना अनोखं आवाहन केले आहे. पोस्ट शेअर करत तिने लिहिलंय की, “मी कधीही कोणत्याही इन्फ्लुएन्सरच्या विरोधात नव्हते. ते कर्तृत्ववान आहेत, याबद्दल मला शंका नाही. मात्र जेव्हा अतिशय कर्तृत्व आणि कलागुण असलेल्या आणि ज्यांनी वर्षानुवर्षे या सिनेसृष्टीत काम केलंय, मेहनत केलीय अशा व्यक्तींऐवजी लोकप्रिय लोकांना प्राधान्य दिले जाते, तेव्हा मला ही एक समस्या असल्याचे जाणवते.
जेव्हा एखाद्या विशिष्ट कलेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांऐवजी हे लोकप्रिय चेहरे दिसतात, त्यामागचं कारण हे केवळ ते फक्त लोकप्रिय असतात. पण त्यामुळे जे लोक त्यात मेहनत करतात त्यांना संधी मिळत नाही. एखाद्या ठिकाणचे प्रतिनिधीत्व करणे हे वेगळे असते आणि स्वत:च्या स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी इंटरनेटचा वापर करुन घेणे, ज्याचा तुम्हाला फायदा होईल, या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या असतात.(Abhidnya Bhave Post Viral)
हे देखील वाचा – बायकोसोबत अभिजीतची थायलंड ट्रिप
मी स्वत: तुम्हाला खूप फॉलो करते. कारण तुम्ही जे काही करता ते फार चांगले आहे. दुर्दैवाने माझ्या इंडस्ट्रीत हा ट्रेंड चालू झाला आहे आणि हे सर्वात निराशाजनक आहे. त्यामुळे आपणच आपले प्रोफेशन्स वेगवेगळे ठेवूया. एक कलाकार”, असं म्हणत तिने ही संतापजनक पोस्ट शेअर केली आहे.
आजकाल छोट्या मोठ्या पडद्यावरही कलाकारांची जागा इन्फ्लुएन्सर्स, रिल स्टार्स ने घेतलेली पाहायला मिळते. यावरून अभिज्ञाने रिल स्टार्सना खुलं आवाहन करणारी पोस्ट शेअर केली आहे. अभिज्ञाच्या या पोस्टवर अद्याप यावर कुणीही उत्तर दिलेलं दिसत नाही.
