‘झी मराठी’ वाहिनी वरील प्रचंड गाजलेली मालिका म्हणजे ‘जुळून येती रेशमीगाठी’. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच मालिकेची कथा, त्यातील व्यक्तिरेखा इतकंच नव्हे तर मालिकेचं शीर्षकगीत देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. मालिकेतील सर्वांची लाडकी जोडी मेघना व आदित्य म्हणजेच अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी हे दोघे तर प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनले होते. (Lalit Prabhakar And Prajakta Mali)
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील कलाकार हे त्यांच्या सोशल मीडियावरून नेहमीच फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. प्राजक्ता व ललित यांची सोशल मीडियावर प्रचंड मोठी फॅन फॉलोविंग देखील आहे. मालिकेतील कलाकार आपल्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियावरुन कधीकधी मालिकेच्या काही आठवणी किंवा किस्सेदेखील शेअर करत असतात. अशातच आता ललितने त्याच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे आणि या फोटोचं निमित्त देखील तितकंच खास आहे.
ललितने त्याच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवर प्राजक्ताबरोबरचे क्यूट फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये “काढायचा का दूसरा भाग? जुळून येती रेशीमगाठी (नाम तो सुना होगा)” असं म्हटलं आहे. ललितने हे फोटो शेअर करण्यामागे खास कारण होतं, ते म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेची दशकपूर्ती. मालिकेला दहा वर्षे पूर्ण झाल्याने ललितने हे फोटो शेअर केले.
आणखी वाचा – अमृता खानविलकरसाठी राज ठाकरेंकडून दिवाळीची खास भेट, गिफ्टमध्ये नक्की काय?
ललितच्या या पोस्टखाली सारंग साठ्ये, प्राजक्ता माळी, क्षिती जोग या कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर मालिकेच्या आणि ललित-प्राजक्ताच्या चाहत्यांनीदेखील अनेक प्रतिक्रिया देत मालिकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान ललितच्या या पोस्टमुळे ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेचा दुसरा भाग येणार आहे का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.